Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panjab Politics: दिल्लीनंतर पंजाबमध्येही मुख्यमंत्री बदलणार? केजरीवालांच्या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी असा दावा केला की, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 11, 2025 | 05:11 PM
Panjab Politics: दिल्लीनंतर पंजाबमध्येही मुख्यमंत्री बदलणार? केजरीवालांच्या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब:  दिल्लीतील आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्या जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री भगवंत मान हसून प्रतिक्रिया दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला झालेल्या पराभवानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी असा दावा केला की, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री भगवंत मान यांना या चर्चांबाबत विचारले असता, त्यांनी हसून उत्तर दिले, “त्यांना म्हणू द्या.” तसेच, पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याच्या काँग्रेसच्या दाव्यालाही त्यांनी साफ नकार दिला आणि पक्षातील नेते व कार्यकर्ते पूर्णपणे पक्षासाठी समर्पित असल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय, कुणाला होणार फायदा? वाचा सविस्तर बातमी

“दिल्ली निवडणुकीत प्रचारासाठी केजरीवाल यांनी आभार मानले”

मंगळवारी (11 फेब्रुवारी) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मंत्री आणि आमदार यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सीएम भगवंत मान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पंजाबमधील सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलेल्या प्रयत्नांसाठी केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले.

पोलिस असल्याची बतावणी, दागिने ठेवण्याचा बहाणा; शिक्रापुरातील महिलेला लुटले

“पंजाब सरकार लोकहिताचे काम करत आहे”

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आपली सरकार लोकहिताची कामे सातत्याने करत आहे. मग ती वीज, शिक्षण, पायाभूत सुविधा किंवा रुग्णालयांची सुधारणा असो, आपला पक्ष प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि यामध्ये आणखी गती आणायची आहे. “दिल्लीतील लोक सांगतात की, गेल्या 75 वर्षांत असे काम न पाहिले आणि न ऐकले, जेवढे आम आदमी पक्षाने केले आहे. विजय-पराजय होतच राहतो, पण दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अनुभवाचा उपयोग आम्ही पंजाबमध्ये करणार आहोत.”

“आमचा पक्ष कामाच्या जोरावर ओळखला जातो”

याशिवाय, मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. आम आदमी पक्ष केवळ आपल्या कामामुळे ओळखला जातो. आम्ही कोणत्याही धर्मावर आधारित राजकारण करत नाही, पैशांचे वाटप किंवा गुंडगिरी करत नाही. आजच्या बैठकीत दिल्लीतली संपूर्ण टीम सहभागी होती. अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत आणि या काळात पंजाबला असे मॉडेल बनवू, जे संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल.”

Web Title: Panjab politics will there be a change in the political equations in punjab after delhi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • Bhagwant Mann

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.