Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament session live Updates: काँग्रेसच्या रॅली पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी? संसदेत सत्ताधारी आक्रमक

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह घोषणांवरही टीका केली. मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2025 | 02:29 PM
Budget Session 2026 : आजपासून सुरु होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Budget Session 2026 : आजपासून सुरु होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभेत हिंसक गोंधळ
  • काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी
  • आजच्या कामकाजात सरकार अनेक महत्त्वाची विधेयकांना मंजुरी मिळण्याची शक्यता
Parliament session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभेत हिंसक गोंधळ पाहायला मिळाला. वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या कथित अपमानावरून लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. भाजप खासदारांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली. यावरून संसदेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी इंडिया आघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. यामागणीवरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगितही करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

काँग्रेस पक्षाच्या रॅलीत केलेल्या वक्तव्यावर जेपी नड्डा यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या रॅलीत घोषणा देण्यात आल्या, “मोदी, तुमची कबर आज नाही तर उद्या खोदली जाईल.” अशा घोषणा काँग्रेस पक्षाची मानसिकता दर्शवतात आणि प्रभावशाली लोकांची निराशा देखील प्रकट करतात. पंतप्रधानांविरुद्ध असे बोलणे आणि त्यांच्या मृत्यूची इच्छा करणे अत्यंत निंदनीय आहे. विरोधी पक्षनेत्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या घटनेबद्दल देशाची माफी मागावी. काँग्रेस पक्ष राजकारणाच्या इतक्या खालच्या पातळीवर गेला आहे की तो कल्पनेपलीकडे आहे.’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या रॅलीत करण्यात आलेल्या कथित घोषणांचा निषेध केला.

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबा

यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह घोषणांवरही टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. सोमवारी संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रिजिजू म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या रॅलीत जे बोलले गेले ते देशातील जनतेने ऐकले. लोकशाहीत आपण सर्व मित्र आहोत, शत्रू नाही.पण काल काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. लोकशाहीत इतकी खालची आणि लज्जास्पद पातळी यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती असे मला वाटते. संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

किरेन रिजिजू यांनी एका जुन्या घटनेची काँग्रेसला आठवण करून देत म्हणाले की, २०१४ मध्ये, जेव्हा भाजपचे माजी खासदार निरंजन ज्योती यांनी विरोधी पक्षनेत्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींनी लगेचच संसदेत माफी मागण्यास सांगितले होते आणि खासदारांनीही माफीही मागितली होती. लोकशाहीत भाषेची पातळी सर्वांना समजली पाहिजे. भाजप आणि एनडीएने कधीही पालकांचे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेताना “मृत्यू” हा शब्द वापरलेला नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी परस्पर आदर आणि शुभेच्छा कायम असतात. लोकशाहीत प्रत्येकाला राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार आहे आणि टीका-विरोध होऊ शकतो, मात्र कुणालाही मारण्याबद्दल विचार करणे किंवा तसे बोलणे स्वीकारार्ह नाही. उघडपणे विरोधकाच्या हत्येला उद्युक्त करणारी मानसिकता कोणती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Pune Crime: खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून हल्ला, शिक्षक शिकवत होते

 

Web Title: Parliament disrupted over alleged insult to pm modi bjp demands apology from sonia gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • lok sabha
  • parliament winter session 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.