ट्रम्प यांच्या दाव्यावरून संसदेत गदारोळ ; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच वादळी झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’, बिहारमधील मतदार यादीचा विशेष फेरपडताळणी (SIR), तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याच्या दाव्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि SIR यावर चर्चा व्हावी, अशी जोरदार मागणी केली. लॉबीत उतरून घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना अध्यक्ष ओम बिरला यांनी वारंवार शांततेचे आवाहन केले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. अखेर त्यांनी कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली.
दुपारी पुन्हा सुरू झाल्यानंतरही तोच गोंधळ कायम राहिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “आम्हाला दोन शब्द बोलायचे होते, पण परवानगी मिळाली नाही,” असा आरोप केला. सततच्या गोंधळामुळे अधिवेशन पुन्हा दोन वेळा स्थगित करावे लागले आणि अखेर संपूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही मल्लिकार्जुन खडगे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ व ट्रम्प यांच्या युद्ध थांबवण्याच्या वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी नियम 267 अंतर्गत पत्र दिलं. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात आलेलं नाही. तसेच ट्रंप यांनी २४ वेळा सांगितले की त्यांच्या हस्तक्षेपामुळे भारत-पाकिस्तान युद्ध टळले. खडगे यांनी हा दावा देशासाठी अपमानास्पद असल्याचे म्हटलं.
त्यावर राज्यसभेतील नेते आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खडगे यांना प्रत्युत्तर दिलं. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत १६ तास लोकसभेत आणि ९ तास राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली आल्यांचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यसभेत गोंधळ असतानाही एक महत्त्वाचा कायदा संमत करण्यात आला. ‘लँडिंग बिल’ नावाचं विधेयक जहाज वाहतुकीसंबंधी असून तो सर्बानंद सोनोवाल यांनी मांडला. काँग्रेस आणि काही इतर पक्षांनी वॉकआउट केल्यावर फक्त काहीच खासदारांच्या उपस्थितीत हे विधेयक आवाजी मतदानाने संमत झालं.
अधिवेशनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही माहिती दिली. या प्रस्तावाच्या बाजूने ५५ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्या तरी एकाच सदस्याने दोनदा स्वाक्षरी केल्याने अंतिम संख्या ५४ झाली आहे.
PM मोदींनी संसद भवनात बोलावली तातडीची बैठक; अमित शहा, जेपी नड्डांसह राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या सदस्यांना डॉ. मीनाक्षी जैन, सदानंद मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह इतर काही सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त करत, दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.