A passenger aircraft crashed in Ahmedabad today india accident news
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद : गुजरातमध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर फ्लाइट AI171 याचा अवघ्या काही मिनिटांमध्ये अपघात झाला आहे. या विमानाने 1.31 मिनिटांनी टेक ऑफ घेतले होते. मात्र अवघ्या सात मिनिटांमध्ये 1.37 मिनिटांनी विमानाचा अपघात झाला आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान एका रुग्णालयावर कोसळले आहे. यामुळे मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी असणार आहे. अपघात झालेल्या विमानामध्ये 242 प्रवाशी प्रवास करत होते. त्याचबरोबर 12 क्रू मेंबर देखील विमानामध्ये होते. याचबरोबर या विमानाचा अपघात हा रहिवासी भागामध्ये झाला आहे. अहमदाबादमध्ये झालेला या विमान रुग्णालयावर क्रॅश झाले. यामध्ये रुग्णालयातील डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. अहमदाबादमधील या विमान अपघातामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. यामुळे गुजरातमधील हा विमान अपघात मृत्यूचा तांडव करणारा ठरला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. रहिवाशी इमारतीच्या परिसरामध्ये विमान कोसळल्यामुळे नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडया आग घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून बीएसएफ आणि एनडीआरएफच्या टीम देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताचे स्वरुप भीषण असल्यामुळे आगीचे आणि धुराचे लोट लांबपर्यंत पसरल्याचे दिसून आले आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे बोईंग विमान अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरात कोसळले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अहमदाबामध्ये कोसळले आहे. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान कोसळले आहे. विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उड्डाण करताना हे विमान कोसळले आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अपघाताची तीव्रता लक्षात घेत गृहमंत्री अमित शाह यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
अहमदाबाद विमान अपघाताच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
Air India कडून अपघाताची पुष्टी
अहमदाबाद-लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतलेली फ्लाइट AI171 ही आज, १२ जून २०२५ रोजी एका घटनेत सामील झाली. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).
-Air India…
— Air India (@airindia) June 12, 2025