फोटो सौजन्य: iStock
हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक जण नववर्षाची सुरुवात म्हणून विविध मंदिरांना भेट देत असतात. चैत्र महिना म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला महिना. यानिमित्ताने देशातील एक राज्य लाखो भाविकांच्या भेटीने गजबजले आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
उत्तरप्रदेश म्हंटलं की अनेकांना आठवते ते अयोध्येतील सुंदर आणि दिमाखदार राम मंदिर. याच दिमाखदार मंदिरातील प्रभू श्री रामाचें दर्शन घेण्यासाठी नेहमीच भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. चैत्र महिन्यात तर राम भक्तांचा महासागरच इथे उसळला आहे. मागील 9 दिवसात 24 लाखांहून अधिक राम भक्त रामनगरीत दाखल झाले आहेत. पण फक्त राम मंदिर येथेच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली असे नाही. उत्तरप्रदेशातील इतर तीर्थस्थानाला सुद्धा भाविकांनी भेट दिली आहे.
Amit Shah : अमित शाहांनी केला नक्षलवाद्यांचा उल्लेख ‘भाई’ ; कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आक्रमक भूमिका
चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी 35 लाखांहून अधिक भक्तांनी विंध्याचल मंदिरात हजेरी लावली, तर तुलसीपूर बलरामपूर येथील माँ पाटेश्वरी मंदिरात 12 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. रामनगरी अयोध्येला 9 दिवसांत तब्बल 24 लाख पर्यटकांनी भेट दिली.
रामनवमीच्या दिवशी तर धार्मिक उत्सवाने भक्तीचे नवे शिखर गाठले. काशीमध्ये दीड लाख भाविकांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले, गोरखपूरमधील विविध मंदिरांतही दीड लाखांहून अधिक भाविकांनी रामभक्तीमध्ये सहभाग घेतला. सहारनपूरच्या माँ शाकुंभरी देवी मंदिरातही 1.5 लाखांहून अधिक भक्तांनी पूजा अर्पण केली. नैमिष येथेही एक लाखांहून अधिक भक्तांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
भारतातील ‘हा’ समुद्र किनारा आहे भलताच रहस्यमयी ! 7000 वर्षांपूर्वीचं गूढ, आणि खजिना
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने भाविकांसाठी उत्तम सोयी-सुविधांची व्यवस्था केली होती. शहर बस, ई-कार्ट, स्वच्छ पिण्याचे पाणी, छत्र इत्यादींची उपलब्धता होती, त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही. योगी आदित्यनाथ यांनी स्वतः चैत्र रामनवमीच्या दिवशी माँ पाटेश्वरी, काशी विश्वनाथ धाम व काल भैरव यांचे दर्शन घेतले. गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षपीठाधिश्वरांनी पारंपरिक कन्या पूजनही केले.