केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (फोटो सौजन्य-X)
छत्तीसगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका विधानावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन करताना त्यांचा उल्लेख ‘भाई’ असा केला. यामुळे आता राजकारण तापले आहे. अमित शाह यांच्या या उल्लेखावरुन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते धनंजय सिंह ठाकूर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना आपले आणि भाऊ असे संबोधून नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या आपल्या सैनिकांचे मनोबल तोडण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेत्याने म्हटले आहे की, त्यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या आपल्या सैनिकांचा, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या निष्पाप नागरिकांचा आणि झीरम घाटी घटनेत शहीद झालेल्या काँग्रेस नेत्यांचा अपमान केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेस नेते धनंजय सिंह ठाकूर पुढे म्हणाले की, “अमित शहा यांचे भाषण अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. भाजप नेत्यांच्या अशा विधानांमुळे हिंसाचार करणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्यांनाच बळ मिळते. नक्षलवाद्यांना भाऊ संबोधल्याबद्दल अमित शहा आणि भाजपने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांची आणि राज्यातील नागरिकांची माफी मागावी,” अशी मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे.
नक्षलवादावर राजकारणाचे आरोप
गृहमंत्री अमित शहा नक्षलवादाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय वैमनस्यातून नक्षलवादाच्या मुद्द्यावर चुकीचे विधान केले आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दुसऱ्या एका काँग्रेस नेत्याने म्हटले की, केंद्रीय गृहमंत्र्यांना चुकीचे विधान करणे शोभत नाही.
#WATCH | दंतेवाड़ा, छत्तीसगढ़: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, “अब वह समय चला गया जब यहां गोलियां चलती थीं और बम धमाके होते थे। मैं उन सभी लोगों से, जिनके हाथ में हथियार हैं, सभी नक्सली भाइयों से, हथियार छोड़ने का आग्रह करने आया हूं। जब कोई नक्सली मारा जाता है तो कोई खुश… pic.twitter.com/DvUKVSQEOp
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2025
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले अमित शहा ?
सोशल मीडियावर अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केंद्रीय नेते अमित शहा यांनी दंतेवाडा येथे याबाबत वक्तव्य केले होते. अमित शाह म्हणाले होते की, आता तो काळ गेला आहे जेव्हा येथे गोळ्या झाडल्या जायच्या आणि बॉम्बस्फोट व्हायच्या. ज्यांच्या हातात शस्त्रे आहेत, सर्व नक्षलवादी बांधवांनी, त्यांनी शस्त्रे सोडून द्यावीत अशी विनंती करण्यासाठी मी आलो आहे. जेव्हा एखादा नक्षलवादी मारला जातो तेव्हा कोणीही आनंदी नसते, परंतु या भागाला विकासाची गरज आहे… विष्णू देव साई आणि विजय शर्मा यांनी घोषणा केली आहे की प्रत्येक नक्षलवादी आत्मसमर्पण करेल त्या गावाला नक्षलमुक्त घोषित केले जाईल आणि विकास निधी म्हणून 1 कोटी रुपये दिले जातील… मुख्य प्रवाहात सामील व्हा, भारत सरकार आणि छत्तीसगड सरकार तुम्हाला पूर्ण संरक्षण देईल, असे आवाहन अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना केले. यामुळे मात्र कॉंग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.