Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commissioner: पंतप्रधान मोदी-राहूल गांधी करणार नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती; काय आहे प्रक्रिया?

देशाचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपत आहे. नवीन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी कायदा मंत्रालयाने तीन सदस्यीय समितीची बैठक बोलावली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2025 | 06:00 PM
Election Commissioner: पंतप्रधान मोदी-राहूल गांधी करणार नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती; काय आहे प्रक्रिया?
Follow Us
Close
Follow Us:

 नवी दिल्ली:  कायदा मंत्रालयाच्या वतीने नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांच्या निवडीसाठी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी तीन सदस्यीय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ १८ फेब्रुवारीला संपणार आहे.

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत वित्त विभाग आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे सचिव सदस्य म्हणून सहभागी होते. यापूर्वी, सर्वांत वरिष्ठ निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त पदावर बढती देण्याची पद्धत होती. मात्र, गेल्या वर्षी CEC आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्तीबाबत नवीन कायदा लागू करण्यात आल्यामुळे निवडीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

Pulwama Attack 2019 Solider Story: आई वाट बघत राहिली, पण वसंत कुमारांचा फोन आलाच नाही…..

२०२२ मध्ये झाली होती राजीव कुमार यांची नियुक्ती

मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा अटी आणि कार्यकाळ) अधिनियम, २०२३ अंतर्गत प्रथमच CEC ची निवड केली जात आहे. मे २०२२ मध्ये राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाने २०२४ मध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये दशकभरानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका तसेच महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्लीमधील निवडणुकांसाठीही जबाबदारी पार पाडली.

राजीव कुमार यांनी सांगितला निवृत्तीचा प्लान

२०२३ मध्ये कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील निवडणुका राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना त्यांनी आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली होती. त्यांनी हलक्या-फुलक्या शब्दांत सांगितले की, मागील १३-१४ वर्षांपासून कामाच्या व्यापामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर चार-पाच महिने हिमालयात जाऊन ध्यानधारणा करणार असून, तिथे स्वतःला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी एकांतवासात राहणार आहेत.

‘त्या’ महिलेला मिळणार न्याय! शास्त्रीनगर रुग्णायल प्रकरणातील आंदोलन मागे, दोषींना

भारताच्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती प्रक्रिया

भारतामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्त (EC) यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ही नियुक्ती केंद्र सरकारच्या शिफारसीनुसार केली जाते.

नियुक्ती प्रक्रिया:

पूर्वीच्या नियमांनुसार, केंद्र सरकारच या निवडीबाबत निर्णय घेत असे. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा अटी आणि कार्यकाळ) अधिनियम, २०२३ लागू झाल्याने नवीन प्रक्रिया पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे—

1. निवड समिती (Selection Committee) द्वारे निवड

2023 च्या नवीन कायद्यानुसार तीन सदस्यीय समिती ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड करते. या समितीमध्ये खालील सदस्य असतात—

  1. पंतप्रधान (अध्यक्ष)
  2. लोकसभेतील विरोधी पक्षनेता
  3. केंद्रीय कायदा मंत्री

ही समिती एका शोध समितीच्या (Search Committee) शिफारशींवर आधारित निर्णय घेते.

2. शोध समिती (Search Committee)

केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे सचिव आणि वित्त सचिव यांच्या समावेशाने शोध समिती तयार होते. ही समिती पात्र उमेदवारांची यादी तयार करते आणि ती निवड समितीकडे सादर करते.

3. अंतिम नियुक्ती

निवड समिती योग्य उमेदवारांची निवड करून त्यांची शिफारस राष्ट्रपतींकडे करते. राष्ट्रपती अंतिम मंजुरी देऊन त्या व्यक्तीची मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करतात

Web Title: Pm modi rahul gandhi to appoint new election commissioners what is the process nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • election commission of india

संबंधित बातम्या

Sharad Pawar Marathi News : शरद पवारांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी…; भाजप आमदार निवडणूक आयोगाला लिहिणार पत्र
1

Sharad Pawar Marathi News : शरद पवारांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी…; भाजप आमदार निवडणूक आयोगाला लिहिणार पत्र

Kunal Kamra: कुणाल कामरा पुन्हा बरळला! निवडणूक आयोगावर केवळ ‘या’ ४ शब्दांत केली टीका
2

Kunal Kamra: कुणाल कामरा पुन्हा बरळला! निवडणूक आयोगावर केवळ ‘या’ ४ शब्दांत केली टीका

Rahul Gandhi in Police custody : “ही लढाई राजकीय नाही तर…; पोलिसांच्या व्हॅनमधून डोकावत राहुल गांधी कडाडले
3

Rahul Gandhi in Police custody : “ही लढाई राजकीय नाही तर…; पोलिसांच्या व्हॅनमधून डोकावत राहुल गांधी कडाडले

LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?
4

LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.