Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

Election Results 2024: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर आज (5 जून) 17 व्या लोकसभेची शेवटची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून ते आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2024 | 03:11 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीचा 2024 निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने 240 जागा जिंकल्यानंतर या लोकसभा निवडणुकीत बहुमतापेक्षा कमी पडले. दरम्यान एनडीएने 292 जागांसह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्याच वेळी, सर्व प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियाने 234 जागा जिंकल्या आहेत.

Prime Minister Narendra Modi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The Prime Minister tendered his resignation along with the Union Council of Ministers. The President accepted the resignation and requested the Prime Minister and the Union Council of Ministers… pic.twitter.com/SHIj1UMWpY

— ANI (@ANI) June 5, 2024

निवडणुकीच्या निकालानंतर 17 व्या लोकसभेची शेवटची बैठक आज (5 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ज्यामध्ये ती विसर्जित करण्यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक ७ जूनला होणार आहे. अशातच नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान, नवीन सरकार स्थापनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. NDA आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. याआधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सध्याची लोकसभा (17वी लोकसभा) विसर्जित करण्याच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली.

8 जून रोजी नव्या एनडीए आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो. राष्ट्रपती भवनाने मंगळवारीच एक निवेदन जारी केले होते की, नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीसाठी राष्ट्रपती भवन ५ ते ९ जून या कालावधीत सर्वसामान्यांसाठी बंद राहील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज रात्रीच्या जेवणासाठी मोदींसह केंद्र सरकारच्या सर्व विद्यमान मंत्र्यांना आमंत्रित केले आहे.

या दिवशी कार्यकाळ संपणार

सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. 543 सदस्यांच्या लोकसभेत भाजपने स्वबळावर 240 जागा जिंकल्या आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखालील NDA ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला 99 जागा मिळाल्या.

बैठकीचे सत्र सुरुच

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राजधानी दिल्लीत राजकीय गोंधळ सुरूच आहे. बुधवारी दिल्लीत एनडीए आणि विरोधी भारत आघाडी पक्षांच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. दोन्ही आघाड्या आपापल्या मित्रपक्षांशी भविष्यातील रणनीतीवर चर्चा करतील.

Web Title: Pm modi to submit resignation to dissolve 17th lok sabha and reaches rashtrapati bhawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • lok sabha
  • Lok Sabha Election 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
1

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
3

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली
4

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.