PM मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक': केजरीवाल, राहुल गांधी, राजीव गांधींचा उल्लेख करत म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं गेल्या पाच दशकात आपण फक्त ‘गरिबी हटाव’ च्या घोषणा ऐकल्या आहेत. पण, आम्ही गरिबांसाठी घोषणा दिल्या नाहीत. त्यांचा खरा विकास केला. आमच्या सरकारनं 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. जमिनीशी जोडलेली माणसं जमिनीवरील सत्यता ओळखून आपलं आयुष्य जमिनीवर घालवतात, तेव्हा जमिनीवर बदल निश्चित घडतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आम्ही गरिबांना खोटी आश्वासनं दिली नााहीत. आम्ही खरा विकास केला आहे. गरिबांचं दु:ख , सामान्य माणसांचा त्रास, मध्यवर्गीयांची स्वप्न असंच कळत नाहीत. त्यासाठी ध्यास लागतो आणि मला दु:खानं सांगावं लागतंय की काही लोकांमध्ये तो नाही. पावसाळ्याच्या दिवसात गळकं छत, त्यावर प्लास्टिकच्या चादरीचे छत, त्याखाळी जगणं किती अवघड आहे. प्रत्येक क्षणाला स्वप्न चिरडली जातात, हे प्रत्येक जण समजू शकत नाही.
भाषणातील महत्त्वाची मु्द्दे
आम्ही 12 कोटींपेक्षा जास्त शौचालयं तयार करुन आई आणि बहिणींचा त्रास कमी केला.काही जणांचा फोकस घरातील जकूजीवर, स्टायलिश शॉवरवर आहे. पण, आमचा फोकस प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याावर आहे.आमच्या सरकारनं पाच वर्षात 12 कोटी कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले.आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन म्हणण्याची सवय झाली होती. त्यांनी एक अडचण ओळखली होती. त्यांनी सांगितलं होतं की, ‘दिल्लीमधून एक रुपया निघतो त्यामधील 15 पैसे गावापर्यंत पोहोचतात. त्यावेळी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत एकाच पक्षाचं राज्य होतं. पण, अद्भूत हाथ सफाई होती. 15 पैसे कुणाकडं जात होते ते तुम्ही सहज ओळखू शकता. देशानं आम्हाला संधी दिली. आम्ही उत्तर शोधण्याचं काम केलं. आमचं मॉडेल बचत आणि विकास आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आहे. ताप वाढल्यावर लोकं काहीही बोलतात. पण, जेव्हा जास्त निराशा-हताशा असते त्यावेळी देखील खूप सारं बोलतात.
ज्यांचा जन्मच झााला नव्हता. जे भारताच्या जमिनीवर कधी अवतरलेच नाहीत, असे 10 कोटी बनावट लोकं सरकारी तिजोरीतून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत होते. आम्ही 10 कोटी बनावट नावं हटवली. त्यामधून जवळपास 3 लाख कोटी रुपया चुकीच्या हातामध्ये जाण्यापासून वाचला.काही जण मोठी-मोठी आश्वासनं देतात. पण, त्यानंतर ती पूर्ण करत नाहीत. हे पक्ष तरुणांना सतत धोका देतात. आपदा बनून आदळली आहेत. आम्ही तरुणांच्या भविष्याचा विचार करुन काम करत आहोत.आम्ही राज्यघटनेनुसार वागतो. द्वेषाचं राजकारण करत नाही.आजकाल काही लोकं शहरी नक्षलवाद्यांची भाषा उघडपणे बोलतात. शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलणाऱ्यांना देशाची राज्यघटना किंवा देशाची एकता समजू शकत नाही.