
AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी... समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
संतोष ठाकूर
२१ व्या शतकातील एआय-चलित जगात मानवतेच्या कल्याणासाठी हा दृष्टिकोन एक महत्त्वाचा दुवा असेल. मोदी म्हणाले की, जेव्हा दशकांपूर्वी इंटरनेटची ओळख झाली तेव्हा कोणालाही माहीत नव्हते की ते किती नोकऱ्या निर्माण करेल. आज एआयच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे मानव आणि बुद्धिमत्ता प्रणाली एकत्र काम करतील आणि प्रगती करतील. कामाचे भविष्य पूर्वनिर्धारित नसते तर ते आपल्या निर्णयांवर आणि धोरणांवर अवलंबून असते.
मोदी म्हणाले की, एआय काम अधिक हुशार, कार्यक्षम आणि प्रभावी बनवेल आणि उच्च-मूल्यवान, सर्जनशील आणि अर्थपूर्ण भूमिकांसाठी संधी वाढवेल. मोदींनी कौशल्य, पुनर्कोशल्य आणि आजीवन शिक्षण हे जनआंदोलन बनण्याचे आवाहन केले. पारदर्शकतेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम जंतुनाशक आहे म्हणजेच पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित केली पाहिजे.
#IndiaAIImpactSummit2026 poises India for leadership in new era building upon the milestones achieved under Modi govt. Hosting largest constellations of global leaders and tech giants, India sets ethical direction for new era with ancient mantra of universal happiness and… pic.twitter.com/l7Q66In5Q1 — Amit Shah (@AmitShah) February 19, 2026
भाषणानंतर पंतप्रधानांसोबत ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते मंचावर उपस्थित होते. ग्रुप फोटो दरम्यान ऑल्टमन आणि अमोदेई यांनी हस्तांदोलन करण्याऐवजी मुठी वर केल्या, ज्यामुळे ही साखळी पूर्ण झाली नाही. संपूर्ण जगाने यावर कमेंट केल्या आहेत.
एम – मोरल आणि एथिकल सिस्टीम एथिकल गायडन्सवर आधारित असावे
ए -अकाउंटेबल गव्हर्नस ट्रान्सपरन्स नियम व मजबूत देखरेख
एन -नॅशनल सॉव्हरेनिटी ज्याचा डाटा, त्याचा अधिकार
ए – अॅक्सेसेबल आणि एन्क्लुसिव्ह मल्टिप्लायर असावे, मोनोपोली नको
व्ही – व्हॅलिड व लेजिटमेन्ट कायदेशीर व व्हेरिफाईड असावे