विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत या, मविआत आला तर दोघांनाही मुख्यमंत्री करू, असा टोला लगावला होता, त्यावर आज अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र 'व्हॅल्यू झोन' ठरवले जातात.
प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय बंद होईल पण सकाळच्या भोंग्याचं काय करायचं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकास्त्र सोडत असतात.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून यामध्ये मटणावरुन राजकारण रंगले आहे. हलाल मटण आणि मल्हार झटका मटण असा वाद सुरु आहे. हिंदूंसाठी वेगळी दुकाने बनवण्याचा प्रयत्न असणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली. यामुळे राजकारण तापले आहे. यावरुन टीका करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना त्यांनी सुनावले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान केले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्यासोबत देखील छळ झाला असल्याचे सांगितले.
anil parab controversial statement : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर जास्त चर्चा रंगली आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज विधानभवनात मोबाईल हरवला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध सुरू आहे. सर्व व्यवस्था सामंताचा मोबाईल शोधण्यासाठी कामाला लागली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर, सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राजीनामा घेतल्याचं सांगितलं, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे.
राज्य शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करीत आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केले.
अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना २ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती देण्यात आली असली तरी आमदारकी आणि त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.
विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यसभेतही त्यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आज त्या सभापतींच्या खुर्चीवर होत्या आणि समोर त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रफुल पटेल होते.
वक्फ संशोधन विधेयकावरून राजकीय हालचाल वाढली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख आणि हैदराबादेतील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला आहे.