Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: “एका दहशतवाद्याने रडत रडत…”; पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2025 | 02:27 PM
PM Narendra Modi: “एका दहशतवाद्याने रडत रडत…”; पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

आज पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस
मध्य प्रदेशच्या सभेतून पाकिस्तानवर टीका
ऑपरेशन सिंदूरवॉर टीका

Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढिदवस आहे. जगभरातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मध्यप्रदेशच्या धार मध्ये मोदींनी एका विशाल सभेला संबोधित केले. वाढदिवसानिमित्त मोदी आदिवासी भागात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी धार येथील सभेत बोलताना म्हणाले, “हा नवीन भारत आहे. भारत कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही. तर घरात घुसून मारतो. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले आहे.

Delighted to be in Dhar, Madhya Pradesh! Speaking at the launch of women-centric initiatives, which will strengthen health and well-being at the grassroots level. PM MITRA Park is also being inaugurated. https://t.co/oRNGJjSLpU

— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2025

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले. आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचा अड्डे उध्वस्त केले. आपल्या शूर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. नुकतेच एका दहशतवाद्याने रडत रडत आपले दुःख सांगितले आहे. हा नवीन भारत जो स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतो. तसेच कोणत्याही धमकीला तो घाबरत नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असताना अनेक विकासकामांचे , योजनांचे लोकार्पण आणि उदघाटन केले आहे. त्यांनी पीएम पार्कचे भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे कापड उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच त्यांनी ‘सशक्त स्त्री सशक्त परिवार’ योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशभरात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई, “तो व्हिडीओ काढून टाका, अन्यथा…”, काँग्रेसला कोर्टाचा दणका

मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय (AI) व्हिडिओबाबतच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने काँग्रेस पक्षाला फटकारले. न्यायालयाने व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. पाटणा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पी.बी. बजंतारी यांच्या न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने काँग्रेस पक्षाने तयार केलेला पंतप्रधानांच्या आईचा एआय व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हे निर्देश सुनावणीदरम्यान जारी करण्यात आले.

 

Web Title: Pm narendra modi criticizes to pakistan pahalgam attack operation sindoor mp dhar 75 th birhtday political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांची नाच्चकी! भारताने नाकारला होता अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा दावा
1

डोनाल्ड ट्रम्प यांची नाच्चकी! भारताने नाकारला होता अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा दावा

‘सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता…’; टीम इंडियाच्या शेकहॅंड प्रकरणावर पाक पत्रकारांनी घरच्याच नेत्यांची काढली खरडपट्टी
2

‘सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता…’; टीम इंडियाच्या शेकहॅंड प्रकरणावर पाक पत्रकारांनी घरच्याच नेत्यांची काढली खरडपट्टी

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर
3

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर

‘मी भगवान शिवाचा भक्त आहे, सगळं विष…’, आईवरील व्हिडिओनंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली मनातील खदखद?
4

‘मी भगवान शिवाचा भक्त आहे, सगळं विष…’, आईवरील व्हिडिओनंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली मनातील खदखद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.