Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभेत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 08, 2025 | 04:30 PM
PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. दरम्यान हा विजय साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्याना संबोधित करण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपने मिळवलेल्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

दिल्ली विधानसभेत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे दिल्लीत 27 वर्षांनी सरकार स्थापन होणार आहे. केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपच्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

लोकशक्ती सर्वोतोपरी! विकास जिंकला, सुशासन जिंकले..

दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माझा प्रणाम आणि अभिनंदन. तुम्ही दिलेल्या भरपूर आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.

जनशक्ति सर्वोपरि! विकास जीता, सुशासन जीता। दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार। दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम… — Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025

दिल्लीचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हा आमचा विश्वास आहे. यासोबतच, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहील याचीही आम्ही खात्री करून घेऊ.

मला भाजपच्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा खूप अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांची सेवा अधिक दृढतेने करण्यासाठी समर्पित राहू.

पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, “आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने ज्या अपेक्षेने भाजपला विजयी केले आहे, ते त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो.”

हेही वाचा: Arvind Kejriwal On Delhi Election: “आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो…”; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेली 10 वर्षे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही खूप कामे केली. आरोग्य , वीज, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू. लोकांच्या आनंदात, दुखा:त आम्ही सहभागी होऊ. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकारण हे एक साधन समजत आलो आहोत.

 

Web Title: Pm narendra modi first reaction after bjp win delhi assembly election result 2025 latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • AAP
  • AAP Arvind Kejriwal
  • Delhi Assembly Election
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी
1

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…
2

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
3

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.