Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Naredndra Modi : PM नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान; ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ने केलं सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना कोणत्याही देशाने दिलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 22, 2024 | 05:37 PM
PM नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने केलं सन्मानित

PM नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने केलं सन्मानित

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना कोणत्याही देशाने दिलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रप्रमुख, विदेशी राज्यकर्ते आणि इतर देशांच्या राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचं प्रतीक म्हणून दिला जातो.

I am honoured to be conferred the Mubarak Al-Kabeer Order by His Highness the Amir of Kuwait, Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al Sabah. I dedicate this honour to the people of India and to the strong friendship between India and Kuwait. pic.twitter.com/fRuWIt34Cx — Narendra Modi (@narendramodi) December 22, 2024

हा सन्मान यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश या नेत्यांना देण्यात आला आहे. कुवेतमधील बायन पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

GST On Popcorn : आता खाद्य पदार्थांवर चवीनुसार द्यावा लागणार GST; जीएसीटी परिषदेत नेमकं काय काय ठरलं? वाचा सविस्तर

शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले आहेत. 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्याशी भारत-कुवेत संबंधांना विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून विस्तृत चर्चा केली.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ने सन्मानित करण्यात आले होते. भूतानचा हा सन्मान मिळणारे ते पहिले विदेशी नेते ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कुवेतमधील कामगार शिबिराला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी कुवेतमधील मिना अब्दुल्ला भागातील गल्फ स्पाइक लेबर कॅम्पला भेट दिली, जिथे सुमारे 1,500 भारतीय नागरिक काम करतात. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला.

Om Prakash Chautala : ५ वेळा CM, तुरुंगवास अन् जेलमधून १०, १२ वी चं शिक्षण; असा होता ओम प्रकाश चौटाला यांचा राजकीय प्रवास

तत्पूर्वी २१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी कुवेत शहरातील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा भारतीय नागरिकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी त्यांच्या ऐतिहासिक दोन दिवसीय दौऱ्यावर कुवेतला गेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी कुवेतला पोहोचले. ४३ वर्षांत या आखाती देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले.आपल्या भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील विशेष संबंध आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

Web Title: Pm narendra modi honor by kuwait highest honour the order of mubarak al kabir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
1

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
2

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
3

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
4

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.