५ वेळा CM, तुरुंगवास अन् जेलमधून १०, १२ वी चं शिक्षण; असा होता ओम प्रकाश चौटाला यांचा राजकीय प्रवास
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं शुक्रवारी दुपारी त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.चौटाला पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. हरियाणाचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या चौटाला यांना मोठा राजकीय लाभला होता. चौटाला यांचे वडील आणि माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल हे देशातील मोठे शेतकरी नेते होते. तरीही चौटाला यांचा राजकीय प्रवास खडतर आणि वादगस्त राहिला आहे.
ओम प्रकाश चौटाला यांचा जन्म 1935 मध्ये हरियाणातील सिरसा येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर चौटाला राजकारणात आले. त्यामुळे त्यांना दहावी आणि बारावीचे शिक्षण त्यावेळी पूर्ण करता आलं नाही. चौटाला 1970 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 1989 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्रिपद बनले. यानंतर ते ४ वेळा . 2013 मध्ये जेव्हा चौटाला शिक्षक भरती प्रकरणात दोषी ठरले तेव्हा त्यांनी तुरुंगातून 10 वी आणि 12 वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी चौटाला 78 वर्षांचे होते.
हरियाणामध्ये 1968 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. चौधरी देवीलाल यांनी त्यांचा मुलगा ओम प्रकाश यांना एलेनाबादमधून उमेदवारी दिली. ही पारंपारिक जागा असल्याने, संपूर्ण चौधरी कुटुंबाने निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु चौटाला लालचंद्र खोडा यांच्याकडून पराभूत झाले. याप्रकरणी चौटाला यांनी हेराफेरीचा आरोप करत उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत, 1970 मध्ये एलेनाबाद जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले. चौटाला यांनी येथून पोटनिवडणूक लढवली आणि विजयी होऊन ते पहिल्यांदाच आमदार बनले.
देशात 1989 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि राजीव गांधींचं सरकारला पराभव सहन करावा लागला. चौधरी देवीलाल यांना केंद्रात उपपंतप्रधान बनवण्यात आले. त्यावेळी देवीलाल हरियाणाचे मुख्यमंत्री होते. देवीलाल केंद्रात आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचा लहान मुलगा चौधरी रणजीत चौटाला या शर्यतीत आघाडीवर होते. त्यावेळी ते हरियाणा विधानसभेचे सदस्यही होते. ओमप्रकाश हे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे शर्यतीत मागे पडले होते, पण देवीलाल यांनी दिल्लीत ओमप्रकाश यांच्या नावाची घोषणा केली. देवीलाल यांच्या पुढाकाराने राज्यपालांनी ओम प्रकाश यांना शपथही दिली. या घटनेनंतर देवीलाल कुटुंबात राजकीय तेढ निर्माण झालं होतं.
चौटाला यांना त्यांचे वडील देवीलाल यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला होता, पुडे त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा वडिलांचा विक्रम मोडला. ओमप्रकाश चौटाला 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते, तर देवीलाल केवळ 2 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले होते. देवीलाल केवळ 4 वर्षे हरियाणाचे मुख्यमंत्री राहू शकले, तर चौटाला यांच्याकडे सुमारे 6 वर्षे हरियाणाची सत्ता होती. चौटाला हे हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.
टाला यांना 2013 मध्ये भरती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ५५ जणांमध्ये त्यांचा मोठा मुलगा अजय चौटाला यांचाही समावेश आहे.या शिक्षेचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा फटका बसला आणि ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत.चौटाला यांची जुलै २०२१ मध्ये तिहार तुरुंगातून सुटका झाली होती.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंध तोडून देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचं काम हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी 2021 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली.सप्टेंबर २०२२ मध्ये फतेहाबादमध्ये चौटाला यांच्या रॅलीत नितीश कुमार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल, राजद नेते आणि बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते.
ओमप्रकाश चौटाला त्यांच्या मालमत्तेवरूनही वादात सापडले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 2006 मध्ये सीबीआयने चौटाला कुटुंबाची एकूण संपत्ती 1467 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.सध्या चौटाला कुटुंबातील अभय चौटाला, अजय चौटाला, रणजीत चौटाला, दुष्यंत चौटाला, नयना चौटाला, सुनैना चौटाला, आदित्य देवी लाल आणि अर्जुन चौटाला राजकारणात सक्रिय आहेत.