PM Modi Live: पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पाडला उघडा; म्हणाले, "अणुहल्ल्याचे ब्लॅकमेलिंग कोणत्याही..."
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध ताणले गेले आहेत. अजूनही संघर्ष संपलेला नाही. युद्धविराम झाला असला तरी भारतीय सुरक्षा दले अत्यंत सतर्क राहिले आहेत. दरम्यान आज या संपूर्ण प्रकरण आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. त्यावेळेस मोदी यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड पाडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर भारतीय सुरक्षा दले अत्यंत सतर्क आहेत. दहशतवादी मोकळेपणाने पाकिस्तानमध्ये फिरत होते. भारताने त्यांना ठार मारले. दहशतवादावर भारताने केलेल्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावर हल्ला सुरू केला. मात्र यामध्ये देखील पाकिस्तानचा चेहरा समोर आला.”
“भारताच्या सक्षम हवाई यंत्रणेने पाकिस्तानचा हल्ला हवेतल्या हवेत उडवून लावला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिळवले आहे. ज्या ठिकाणी दहशतवादाची मूळे आहेत तिथे घुसून कारवाई करणार. भावलपूर आणि मुरीद सारखे दहशतवादी अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले आहेत.हे अड्डे जागतिक दहशतवादाचे स्थळ झाले आहे. जगातील अनेक हल्ल्यांमध्ये या ठिकाणांचे नाव जोडले गेले आहे”, असे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech: “… मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावर वार केला”; मोदींचा जोरदार हल्लाबोल
“भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला सहन करणार नाही. अणुहल्ल्याच्या होणारे ब्लॅकमेलिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत सहन करणार नाही. सडेतोड उत्तर हे दिलेच जाणार. आम्ही भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी खुली सूट दिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उडवून लावले. पाकिस्तान जगाकडे भीक मागत होता. मात्र पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. आम्ही पाकिस्तानविरुद्धची कारवाई केवळ स्थगित केली आहे. भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल.”
“यांच्या देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कडक पावले उचलण्यास सक्षम आहेत. ऑपरेशन सिंदूरने देशाचे सामर्थ्य दाखवले आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास भारत जोरदार उत्तर देणार. युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला धूळ चारली आहे. दहशतवादाचे ज्या ठिकाणी उगमस्थान असेल त्या ठिकाणी हल्ले करणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काय आहे पहलगाम हल्ला प्रकरण?
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर देशवासियांना संबोधित केले.