PM Narendra Modi Live: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेली कारवाई, घेतलेले अनेक धोरणात्मक निर्णय यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी नक्की काय संबोधन केले आहे, ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सर्वात पहिल्यांदा भारताच्या पराक्रमी सैनिकांना, गुप्तचर यंत्रणा आणि सर्व देशवासीयांना सलाम करतो. गेल्या काही दिवसांत आपण देशाचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिला. ऑपरेशन सिंदूरमधून देशाची ताकद दिसून आली. २२ एप्रिलला पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर हल्ला झाला. अतिरेक्यांनी यांच्या बहीणींचे कुंकू पुसले. म्हणून आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले आहेत.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांची मुख्य अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले. स्वप्नातही अतिरेक्यांनी विचारही केला नसेल अशी आम्ही त्यांना शिक्षा दिली आहे. ऑपरेशन सिंदूर हे देशातील नागरिकांची भावना आहे. पाकिस्तानचा उद्देश भारताच्या सीमेला लक्ष्य करण्याचा होता. मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावर वार केला.”
“आम्ही भारतीय सैन्याला कारवाई करण्यासाठी खुली सूट दिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उडवून लावले. पाकिस्तान जगाकडे भीक मागत होता. मात्र पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. आम्ही पाकिस्तानविरुद्धची कारवाई केवळ स्थगित केली आहे. भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल.”
“यांच्या देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कडक पावले उचलण्यास सक्षम आहेत. ऑपरेशन सिंदूरने देशाचे सामर्थ्य दाखवले आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास भारत जोरदार उत्तर देणार. युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला धूळ चारली आहे. दहशतवादाचे ज्या ठिकाणी उगमस्थान असेल त्या ठिकाणी हल्ले करणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्याला स्वतःलाच दहशतवादाचा नाश करावा लागेल. दहशतवादी आणि संवाद एकाच वेळी होणार नाही. पाणी आणि रक्तपात एकाच वेळी वाहू शकत नाही. हे भारताचे स्पष्ट मत आहे. सध्याचा युग हे दहशतवादाचे आणि युद्धाचे नाही. पाकिस्तानशी बोलणे झाले तर पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच होईल”, असे मोदी म्हणाले.
काय आहे पहलगाम हल्ला प्रकरण?
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर देशवासियांना संबोधित केले.