Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मणिपूरला देणार भेट? ‘असा’ असेल दौरा

पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2025 | 11:37 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार आसामला भेट; कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार आसामला भेट; कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार

Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या उद्रेकानंतर दोन वर्षांहून अधिक काळानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मणिपूरला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनसार, पंतप्रधान 13-14 सप्टेंबर रोजी आसाम आणि मिझोरामला भेट देणार आहेत. या काळात ते मणिपूरलाही भेट देऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांनी देखील अनेकदा पंतप्रधान मोदींना मणिपूरला न गेल्याबद्दल धारेवर धरले होते. यावरून टीकाटिप्पणी वेळोवेळी केली जात होती. असे असताना आता पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.

मणिपूर येथील मैतेई आणि कुकी समाजातील बांधवांमध्ये संघर्ष सुरू होता. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला. त्यापासूनच विरोधक मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत. या संघर्षात 250 हून अधिक लोक मारले गेले आणि 57000 हून अधिक लोक विस्थापित झाले. त्यानंतर, याचवर्षी 13 फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. असे केल्याने आता तुलनेने येथील सामान्य परिस्थिती आहे. दरम्यान, पंतप्रधान मिझोरमहून इम्फाळला जाणार आहेत, जिथे ते 13 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील.

राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी

इम्फाळस्थित एका संस्थेचे सल्लागार जितेंद्र निंगोम्बा म्हणाले की, मोदींच्या भेटीमुळे शांतता किंवा तोडगा निघेल अशी आशा आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपवून पुन्हा सरकार स्थापन करण्याची मागणी एनडीएच्या आमदारांकडून वाढत आहे. ही मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि त्यांच्या जवळचे आमदारांचा समावेश आहे.

Web Title: Pm narendra modi may visit manipur for the first time after the violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Manipur Violence
  • PM Narendra Modi
  • Violence in Manipur

संबंधित बातम्या

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”
1

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”

PM Modi Diwali Wishes: “ही दिवाळी देखील खास आहे कारण…, PM मोदींनी दीपावलीनिमित्त देशवासियांना लिहिले खास पत्र
2

PM Modi Diwali Wishes: “ही दिवाळी देखील खास आहे कारण…, PM मोदींनी दीपावलीनिमित्त देशवासियांना लिहिले खास पत्र

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
3

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; शुभेच्छांची देवाणघेवाण
4

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; शुभेच्छांची देवाणघेवाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.