Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AB-PMJAY : वृद्धांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! पंतप्रधान मोदींकडून आरोग्य विमा जाहीर, कसा कराल अर्ज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वृद्धांसाठी आरोग्य विमा योजना जाहीर केली आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत वय वर्षे 70 आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य सुरक्षा दिली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 29, 2024 | 12:03 PM
PM Narendra Modi to launch health coverage for senior citizens above 70 today

PM Narendra Modi to launch health coverage for senior citizens above 70 today

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जेष्ठ नागरिकांसाठी आनंदवार्ता समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृद्धांसाठी आरोग्य विमा जाहीर केले आहे. आज (दि.29) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वय वर्षे 70 आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य सुरक्षा दिली जाणार आहे. वृद्धांसाठी ही महत्त्वाची योजना भारत सरकारने आणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोग्य विमा यांसह अनेक योजना जाहीर करणाक आहेत. आज मंगळवारी काही इतर प्रकल्पही लॉन्च करतील, ज्यात U-WIN पोर्टलचा समावेश असणार आहे. जो भारताच्या कोविड-19 लस व्यवस्थापन प्रणाली Co-WIN च्या मॉडेलवर आधारित आहे आणि जन्मापासून 17 वर्षांपर्यंत मुलांच्या लसीकरणाचा कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांसाठी ही देखील ही पद्धत वापरली जाणार आहे. U-WIN प्लॅटफॉर्म, कोविड-19 लस व्यवस्थापन प्रणाली Co-WIN ची प्रमाणे ही कार्यप्रणाली आहे. लसीकरण कार्यक्रम विकसित केला आहे.

हे देखील वाचा : पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत! सहाव्या दिवशी ११ उमेदवारी अर्ज दाखल

मीडिया रिपोर्टनुसार, “पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी विस्तारित योजना सुरू करू शकतात. याचा फायदा सुमारे 4.5 कोटी कुटुंबांतील सुमारे सहा कोटी नागरिकांना होईल. यामध्ये गरीब असो, मध्यमवर्गीय असो, उच्च मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती आयुष्मान कार्ड मिळविण्यास पात्र असणार आहे. त्याचबरोबर AB PMJAY च्या कोणत्याही पॅनेलीकृत रुग्णालयात रु. 5 लाखांपर्यंत विस्तारित योजना सुरू होईल रु. 1 सप्टेंबर 2024 पर्यंत PMJAY अंतर्गत 12,696 खाजगी रुग्णालयांसह एकूण 29,648 रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत.

हे देखील वाचा : मुलाला सुधारा नाहीतर…. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनव अरोराला जीवे मारण्याची धमकी; कुटूंबियांचा धक्कादायक दावा

कसा घेता येईल लाभ?

आरोग्य विमा घेण्यासाठी, लोकांना PMJAY पोर्टलवर किंवा आयुष्मान ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे त्यांना पोर्टल किंवा ॲपवर पुन्हा अर्ज करावा लागेल आणि नवीन कार्डसाठी त्यांचे eKYC पूर्ण करावे लागेल.  ही योजना सध्या दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगाल वगळता 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केली जाणार आहे. जे ज्येष्ठ नागरिक खाजगी आरोग्य विमा पॉलिसी किंवा कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ घेत आहेत, ते देखील योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील.

जे ज्येष्ठ नागरिक, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे, जे इतर सार्वजनिक आरोग्य विमा योजना वापरत आहेत जसे की केंद्र सरकारची आरोग्य योजना, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना आणि आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल त्यांच्या सध्याच्या योजनेपैकी एक निवड करावी लागेल किंवा आयुष्मान भारत योजनेची निवड करावी लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, AB PM-JAY योजनेत 10.74 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांचा समावेश आहे, ज्यात भारतातील तळाच्या 40 टक्के लोकसंख्येचा समावेश आहे.

Web Title: Pm narendra modi to launch health coverage for senior citizens above 70 today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
1

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश
2

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.