Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

Cabinet Decisions 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. युगे युगिन भारत' नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाला मंजुरी तसेच स्टँड-अप इंडिया योजनेसाठी निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 11, 2026 | 04:56 PM
Union Cabinet Approves 5 Major Decisions ( केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली )

Union Cabinet Approves 5 Major Decisions ( केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली )

Follow Us
Follow Us:
  • ‘युगे युगिन भारत’ संग्रहालयासाठी ३,२३० कोटी  
  • नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 
  • शेतकऱ्यांसाठी ६२,३७० कोटींचे खत 
  • मुद्रा योजनेसाठी ५,००० कोटींचा पतहमी निधी 
  • स्टँड-अप इंडिया योजनेसाठी ४,१११ कोटींचा निधी 
Cabinet Decisions 2026 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (११ नोव्हेंबर २०२६) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशाच्या विकासाच्या संबंधित पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीमध्ये भारताचा सांस्कृतिक वारसा आणि जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी जगातील सर्वात मोठे संग्रहालय उभारले जाणार आहे. तसेच नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाला सुद्धा मंजुरी देण्याचा, आणि शेतकऱ्यांसाठी हजारो कोटी रुपयांचे खत अनुदान मंजूर करण्याचा समावेश करण्यात अला आहे. असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांची माहिती दिली.

– काय आहेत मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय

‘युगे युगिन भारत’ संग्रहालयासाठी ३,२३० कोटी

भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडण्यासाठी ‘युगे युगिन भारत’ या भव्य संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३,२३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय ठरणार आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या संग्रहालयातून घडणार आहे.

नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

नोएडा आणि ग्रेटर नोएडा दरम्यानच्या ८.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ६२,३७० कोटींचे खत

शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रब्बी हंगामासाठी खत अनुदानापोटी ६२,३७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अनुदानित दरात खते उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

Asian Para Games: भारताच्या खेळाडूंनी मोडला 2023 चा ‘हा ‘रेकॉर्ड; आज दिल्लीत Modi थेट…

मुद्रा योजनेसाठी ५,००० कोटींचा पतहमी निधी

युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५,००० कोटी रुपयांचा पतहमी निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे.

स्टँड-अप इंडिया योजनेसाठी ४,१११ कोटींचा निधी

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत ४,१११ कोटी रुपयांचा पतहमी निधी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वंचित घटकांमधील उद्योजकतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या पाच निर्णयांमधून सांस्कृतिक वारशाचे जतन, पायाभूत सुविधांचा विकास, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि तरुणांसह महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यावर सरकारने भर दिल्याचे दिसून येत आहे.

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली

Web Title: Union cabinet 5 major decisions subsidy 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • BJP
  • cabinet decisions
  • Modi Cabinet
  • narendra modi

संबंधित बातम्या

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली
1

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
2

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
3

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप
4

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.