भोपाळ: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशच्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भोपाळमध्ये महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्या देवी महिला सशक्तीकरण महासंमेलन कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांनी ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केले. ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचा हा पहिलाच मध्य प्रदेशचा दौरा आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर तोफ डागली आहे.
मध्यप्रदेशच्या भोपाळमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सर्वात आधी मी भारत माता, स्त्री शक्तीला प्रणाम करतो. आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने माता भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. तुम्ही यांच्यावर गोळ्या झाडल्या तर आम्ही त्याचे उत्तर गोळ्यांनीच देऊ अशी गर्जना 140 कोटी भारतीय करत आहेत.
“कुंकू हे आपल्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला तो केवळ आपल्या नागरिकांवर नाही तर आपल्या परंपरेवर केलेल्या हल्ला आहे. त्यांनी स्त्री शक्तीला आव्हान दिले. हे आव्हान दहशतवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना भारी पडले आहे”, असे मोदी म्हणाले.
मध्य प्रदेश के भोपाल में आज लोकमाता देवी अहिल्याबाई होल्कर के 300वें जयंती समारोह का हिस्सा बनना मेरे लिए परम सौभाग्य की बात है। https://t.co/IHWiqMsese
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2025
PM नरेंद्र मोदींचा रोख नक्की कोणाकडे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “प्राण जाए पर वचन ना जाए. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्या झाल्यावर मी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार असा बिहारच्या भूमीवरून तुम्हाला शब्द दिला होता.” पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा मिळणार असा मी शब्द दिला होता. आज मी दिलेला शब्द पूर्ण करून बिहारमध्ये आलो आहे.”
“जगाने आणि पाकिस्तानने भारताची ताकद अनुभवली आहे. ऑपरेशन सिंधूर मधून जगाने बीएसएफसचे शौर्य पाहिले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी बीएसएफ जवान इम्तियाज यांनी आपले प्राणांचे बलिदान दिले. मी बिहारच्या या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करतो. दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई कधी थांबली नाही आणि थांबणारही नाही. दहशतवाद्यांनी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले किंवा भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही,” असे मोदी म्हणाले.
“… त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही”; PM नरेंद्र मोदींचा रोख नक्की कोणाकडे?
PM मोदींचा पाकिस्तानला इशारा
गुजरातच्या मातीतून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पर्यटन लोकांना जोडते पण पाकिस्तानसारखा एक देश देखील आहे, जो दहशतवादाला पर्यटन मानतो आणि हा जगासाठी एक मोठा धोका आहे. दहशतवादाविरुद्ध आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. ऑपरेशन सिंदूरने हे धोरण आणखी स्पष्ट केले आहे. जो कोणी भारतीयांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आनंदी जीवन जगा, भाकरी खा… नाहीतर माझी गोळी आहेच, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारताची दिशा अगदी स्पष्ट आहे. भारताने विकासाचा मार्ग निवडला आहे, शांतता आणि समृद्धीचा मार्ग निवडला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.