पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर (फोटो- सोशल मिडिया)
पटना: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज बिहारमध्ये अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी ऑपरेशन सिंदुरबद्दल देखील भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या कराकोट दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी ४८, ५२० कोटींच्या कामांचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “प्राण जाए पर वचन ना जाए. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्या झाल्यावर मी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार असा बिहारच्या भूमीवरून तुम्हाला शब्द दिला होता.” पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा मिळणार असा मी शब्द दिला होता. आज मी दिलेला शब्द पूर्ण करून बिहारमध्ये आलो आहे.”
“जगाने आणि पाकिस्तानने भारताची ताकद अनुभवली आहे. ऑपरेशन सिंधूर मधून जगाने बीएसएफसचे शौर्य पाहिले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी बीएसएफ जवान इम्तियाज यांनी आपले प्राणांचे बलिदान दिले. मी बिहारच्या या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करतो. दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई कधी थांबली नाही आणि थांबणारही नाही. दहशतवाद्यांनी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले किंवा भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींकडून हजारो कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी एनएच २७ मधील गोपालगंज येथे फोर लेन हायवेचे लोकार्पण केले. तसेच पटना गया डोभी या हायवेचे उद्घाटन केले. ज्याची किंमत साधारण ५,५२० कोटी इतकी आहे.
PM Narendra Modi: “… मात्र सरदार पटेलांचे ऐकले गेले नाही”; गुजरातमधून मोदी पाकिस्तानवर कडाडले
PM मोदींचा पाकिस्तानला इशारा
गुजरातच्या मातीतून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पर्यटन लोकांना जोडते पण पाकिस्तानसारखा एक देश देखील आहे, जो दहशतवादाला पर्यटन मानतो आणि हा जगासाठी एक मोठा धोका आहे. दहशतवादाविरुद्ध आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. ऑपरेशन सिंदूरने हे धोरण आणखी स्पष्ट केले आहे. जो कोणी भारतीयांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आनंदी जीवन जगा, भाकरी खा… नाहीतर माझी गोळी आहेच, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारताची दिशा अगदी स्पष्ट आहे. भारताने विकासाचा मार्ग निवडला आहे, शांतता आणि समृद्धीचा मार्ग निवडला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.