Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMO New Name: पंतप्रधान कार्यालय आता ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार; तर राजभवन ‘लोकभवन’ होणार

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये एक मोठा बदल होत आहे. प्रशासनाची कल्पना सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे सरकत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2025 | 10:38 AM
PMO Renamed as ‘Seva Tirth’;

PMO Renamed as ‘Seva Tirth’;

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO)नावात बदल
  • नवीन संकुलाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नाव
  • हा बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक देखील
PMO New Name: राजधानी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO)नावात बदल करण्यात आला आहे. ययापुढे पीएमओ कार्यालयाचे नाव “सेवा तीर्थ” म्हणून ओळखले जाईल. त्याचवेळी देशभरातील राजभवनांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. आता त्यांना लोक भवन म्हणून ओळखले जाईल, अशीही माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) नवीन संकुलाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नाव दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून उभारण्यात येणाऱ्या या संकुलाचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

Akhilesh Yadav News: ‘ज्यांचा इतिहासच हेरगिरीचा तर ते…’; अखिलेश यादवांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं

पूर्वी ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ म्हणून ओळखले जाणारे हे संकुल नव्या स्वरूपात पंतप्रधान कार्यालयासाठी तयार होत असून, त्यात कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंडिया हाऊस यांची कार्यालये देखील असणार आहेत.

या संकुलातील इंडिया हाऊस हे भेट देणाऱ्या मान्यवरांशी उच्चस्तरीय संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार असून, आंतरराष्ट्रीय बैठका, चर्चा आणि धोरणात्मक संवादासाठी ते खास तयार करण्यात येणार आहेत.नवीन PMO संकुलामुळे सरकारच्या प्रशासनिक कामकाजात अधिक समन्वय आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक देखील

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये एक मोठा बदल होत आहे. प्रशासनाची कल्पना सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे सरकत आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक देखील आहे. पंतप्रधान कार्यालय (PMO) त्याच्या ७८ वर्षांच्या साउथ ब्लॉकमधून “सेवा तीर्थ” नावाच्या नवीन प्रगत कॅम्पसमध्ये जात आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे.

Delhi Bomb Blast सुनियोजितच; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मिळाले धक्कादायक पुरावे; ड्रोन-रॉकेट अन्…

राजपथ आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या नावात बदल

केंद्र सरकारने दिल्लीतील ‘राजपथ’च्या नावात बदल करून ‘कर्तव्य पथ’ असे करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा रस्ता आता एक संदेश देतो: सत्ता हा अधिकार नाही; तर एक कर्तव्य आहे. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नावही बदलण्यात आले होते. पूर्वी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव ‘रेसकोर्स रोड’ असे होते, परंतु २०१६ मध्ये हे नाव बदलून ‘ लोक कल्याण मार्ग’ असे करण्यात आले. हे नाव सार्वजनिक कल्याणाच्या भावनेला अधोरेखित करते. अधिकाऱ्यांच्या मते, कल्याणाची भावना व्यक्त करते आणि प्रत्येक निवडून आलेल्या सरकारच्या भविष्यातील कामाची आठवण करून देते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या विविध क्षेत्रांची पुनर्रचना करून त्यांना “कर्तव्य” आणि पारदर्शकता या मूल्यांचे प्रतिक देण्याचा प्रयत्न होत आहे. या संकल्पनेचा भाग म्हणून उभारण्यात आलेल्या केंद्रीय सचिवालय या विशाल प्रशासकीय केंद्राला ‘कर्तव्य भवन’ असे नाव देण्यात आले आहे.

सरकारचा भर सत्तेवर नव्हे तर सार्वजनिक सेवेला दीर्घकालीन वचनबद्धता देण्यावर असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. “हे बदल एका खोल वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय लोकशाही आता सत्तेपेक्षा जबाबदारी आणि पदापेक्षा सेवेचे प्रतीक बनत आहे,” असे सूत्रांनी सांगितले. नावांतील बदल केवळ प्रतिमा बदलण्यासाठी नसून, मानसिकतेतील बदलाचे प्रतिनिधित्व करतात, असेही सांगितले जाते. नव्या योजनेत प्रशासनाची भाषा आज सेवा, कर्तव्य आणि नागरिक-प्रथम दृष्टिकोनावर आधारित असल्याचे स्पष्ट केले जात आहे.

 

Web Title: Pmo renamed as seva tirth governor houses across india to be known as lok bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • pmo office
  • pmoindia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.