
चेन्नई : तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसाने महिलेला बुरखा तोंडावरून हटवण्यास सांगितले. तसेच तुझा सुंदर चेहरा नीट दिसत नाही. त्यामुळे बुरखा हटव असे पोलिसाने महिलेला म्हटल्याचा आरोप आहे. महिला पोलीस स्टेशनमध्ये काही कामासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याशी अशी वर्तवणूक करण्यात आली आहे.
महिलेची स्कूटर चोरी झालेली होती. त्यामुळे महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी ती आली होती. 14 फेब्रुवारीला या महिलेची स्कूटर चोरी झाली होती. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला.
हेड कॉन्स्टेबल विरोधात तक्रार
हेड कॉन्स्टेबलने फातिमाला सांगितले की, तुला स्कूटर हवी असेल तर तुला कोर्टात जावे लागेल. हे ऐकून फातिमा काहीशी हैराण झाली आणि रडू लागली. यावर हेड कॉन्स्टेबल तिला म्हणाला की, तू रडताना खूप चांगली वाटत आहेत. एक काम करत तू आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा देखील हटव, मला तुझा सुंदर चेहरा पाहू दे. पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या अशा असभ्य टिप्पणीमुळे फातिमाला धक्काच बसला. तिने त्यानतर हेड कॉन्स्टेबल विरोधात तक्रार दाखल केली.