
नभ: स्पृशं दीप्तम्! राष्ट्रपती मूर्मूंची 'राफेल' भरारी; एअरबेसवर जवानांनी दिला 'गार्ड ऑफ ऑनर'
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राफेलमधून केले उड्डाण
अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून केले उड्डाण
वायुसेनेने राष्ट्रपतींना दिला गार्ड ऑफ ऑनर
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेल विमानातून उड्डाण केले आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हरियाणा येथील अंबाला येथील एअरफोर्स स्टेशनवरून राफेलमधून उड्डाण केले आहे. राफेल हे भारताचे अत्यंत अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या भारतीय सैन्य दलांच्या प्रमुख आहेत. त्यांनी राफेलमधून घेतलेले उड्डाण हे भारतीय सैन्य दलांसाठी मनोबल वाढवणारे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे अंबाला एअरफोर्स स्टेशनवर स्वागत करण्यात आले आहे. एअर चीफ मार्शल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे स्वागत केले. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
President Droupadi Murmu took a sortie in a Rafale aircraft at Air Force Station, Ambala, Haryana. She is the first President of India to take sortie in two fighter aircrafts of the Indian Air Force. Earlier, she took a sortie in Sukhoi 30 MKI in 2023. pic.twitter.com/Rvj1ebaCou — President of India (@rashtrapatibhvn) October 29, 2025
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू हवाई मार्गे अंबाला एअरबेसवर दाखल झाल्या. अंबाला हवाई दल हे राफेल लढाऊ विमानांचे मुख्य बेस आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अंबाला हवाई बेसवर सैनिकांची भेट घेतली. तसेच त्यांनी येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोडक्यात बचावल्या
केरळमधील पथनमथिट्टा इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर उतरवण्या आले. अचानक हेलिपॅडचा एक भाग कोसळला अन् काही वेळातच सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान एक मोठी दुर्घटना टळली. राष्ट्रपतींना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर प्रमादोम स्टेडियमवर उतरताच डांबरी भागाचा एक भाग कोसळला आणि खड्डा निर्माण झाला. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि हेलिकॉप्टर कोसळलेल्या भागातून बाहेर काढले. राष्ट्रपती मुर्मू आता राजभवनातून रस्त्याने सबरीमाला मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत.
केरळमधील पथनमथिट्टा इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. आज (२२ ऑक्टोबर) सकाळी अचानक हेलिपॅडचा एक भाग कोसळला अन् काही वेळातच सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली. राष्ट्रपती शबरीमला इथल्या भगवान अय्यप्पा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जात होत्या. सुदैवानं, एक मोठी दुर्घटना टळली आणि सर्वजण सुरक्षित आहेत. ही घटना सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये घडली. प्रमादोम स्टेडियममध्ये बांधलेले हेलिपॅड राष्ट्रपती मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरच्या जड वजनाला तोंड देऊ शकले नाही. डांबरी भाग कोसळला, ज्यामुळे चाकांना स्पर्श झालेल्या ठिकाणी खड्डा निर्माण झाला. सुदैवाने, घटनेच्या वेळी राष्ट्रपती मुर्मू हेलिकॉप्टरमध्ये नव्हते.