दिवाळीनंतर राजधानी दिल्लीमध्ये हवा प्रदुषण झाले असून रेकॉर्ड मोडला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Delhi Pollution News Today : नवी दिल्ली : संपूर्ण देशामध्ये दीपावली सणाचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीसह देशातील कानाकोपऱ्यामध्ये आतिषबाजी केली जात आहे. फटाके फोडत दिवाळी साजरी केली जात असली तरी यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये ग्रीन फटाके फोडण्याची फक्त परवानगी असताना देखील एका रात्रीमध्ये प्रदुषणाचा उच्चांक गाठला. दिल्ली शहराने मागील चार वर्षांचा प्रदुषणाचा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला असून हवा प्रदुषित झाली आहे.
दिवाळीच्या रात्री राजधानी दिल्ली जोरदार आतिषबाजी करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा दिल्लीची हवा प्रदुषित झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारी जाहील केली आहे. आकडेनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजता दिल्लीचा २४ तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४५ नोंदवला गेला, जो ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत येतो. मागील वर्षांच्या तुलनेत, तो २०२४ मध्ये ३३०, २०२३ मध्ये २१८, २०२२ मध्ये ३१२ आणि २०२१ मध्ये ३८२ पेक्षा जास्त होता. संपूर्ण रात्रभर AQI ३४४ ते ३५९ दरम्यान राहिला आणि मंगळवारी दुपारपर्यंत सरासरी ३५१ नोंदवण्यात आला.
दिवाळीच्या रात्री PM2.5 ची पातळी प्रति घनमीटर ६७५ मायक्रोग्रामवर पोहोचली, जी गेल्या चार वर्षातील सर्वाधिक आहे. २०२४ मध्ये ती ६०९, २०२३ मध्ये ५७०, २०२२ मध्ये ५३४ आणि २०२१ मध्ये ७२८ होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रदूषण डेटा गहाळ झाल्याचा दावे
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दुपारी ४ वाजता पातळी ९१ मायक्रोग्राम होती आणि मध्यरात्रीपर्यंत ती हळूहळू ६७५ पर्यंत वाढली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्याचा वेग कमी झाला, ज्यामुळे प्रदूषकांना तरंगता आले आणि ते पसरत नव्हते. पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की प्रदूषण निरीक्षणाचा सर्व डेटा सुरक्षित आहे आणि वेबसाइट आणि अॅप सामान्यपणे कार्यरत आहेत. तथापि, काही पर्यावरण तज्ञांनी असा दावा केला की प्रदूषणाच्या उच्चतम वेळेचा डेटा गहाळ आहे.
ध्वनी प्रदूषणातही झपाट्याने झाली वाढ
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) च्या आकडेवारीनुसार, शहरातील २६ पैकी २३ ध्वनी निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळी परवानगीयोग्य मर्यादेपेक्षा जास्त नोंदवली गेली. करोल बागमध्ये रात्री ११ वाजता ९३.५ डेसिबल (A) ध्वनी पातळी नोंदवली गेली, तर परवानगीयोग्य मर्यादा ५५ डेसिबल (A) आहे. श्री अरबिंदो मार्ग सारख्या शांतता क्षेत्रातही ध्वनी पातळी ६५ डेसिबल (A) पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये जोरदार फटाक्यांचा आवाज झाला असल्याचे दिसून येत आहे.
देशांसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा
रविवारी एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ने GRAP चा दुसरा टप्पा सक्रिय केला. प्रदूषणात वाहतुकीचा वाटा १४.६% होता, त्यानंतर नोएडा ८.३%, गाझियाबाद ६%, गुरुग्राम ३.६% आणि पेंढा जाळण्याचा वाटा १% होता. सीपीसीबीचे माजी अधिकारी दीपंकर साहा म्हणाले की, येत्या काळात वाढत्या वाऱ्याचा वेग प्रदूषण कमी करू शकतो. मात्र दिवाळीमध्ये देशातील अनेक राज्यामध्ये हवा प्रदुषित झाली आहे.
दिल्ली प्रदूषणावरून राजकीय वादंग
दिल्लीतील वायू प्रदूषणावरून राजकीय वादविवादही शिगेला पोहोचला आहे. मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर तीव्र आरोप केले ते म्हणाले की, आप पंजाबच्या शेतकऱ्यांना गवत जाळण्यास प्रोत्साहित करत आहे, ज्यामुळे दिल्लीची हवा आणखी प्रदूषित होत आहे. याला प्रत्युत्तर देताना, आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सिरसा “अशिक्षित” असल्याचे म्हटले आणि म्हटले की पंजाबचा एक्यूआय फक्त १५६ आहे, जे स्पष्टपणे दर्शवते की प्रदूषण दुसऱ्याच गोष्टीमुळे होत आहे.