Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना स्मार्ट आणि संवेदनशील पोलिसिंगचा मंत्र दिला. सायबर गुन्हे, डीपफेक आणि चुकीच्या माहितीविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 10, 2026 | 08:33 PM
Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र

Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र

Follow Us
Follow Us:
  • टीमवर्क आणि जनसहभागाचा कानमंत्र
  • वरिष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव ठेऊ नका
  • अफवा आणि डीपफेकविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन
 

 

पोलिसांनी नागरिकांवर श्रेष्ठत्व गाजवण्याऐवजी त्यांच्याप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव ठेवून काम करावे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत स्मार्ट पोलिसिंगला प्राधान्य द्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी युवा आयपीएस अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलतेने ऐकून त्यांचे निराकरण करणे आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती भवनात भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) ७८ आरआर (२०२५ बॅच) मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे नागरिकांसाठी शासनव्यवस्थेचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे पोलीस यंत्रणेचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू असेल, तर नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. पोलीस व्यवस्था चांगली काम करत असेल, तर लोकांना शासनही चांगले असल्याची जाणीव होते, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

 

नागरिकांच्या तक्रारी एखादा पोलीस अधिकारी संवेदनशीलतेने आणि लक्षपूर्वक ऐकून घेतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला मोठा मानसिक आधार मिळतो. विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.

त्यामुळे अशा नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि तक्रारींचे योग्य निराकरण करणे याला पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

टीमवर्क आणि जनसहभागाचा कानमंत्र

 

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपतींनी टीमवर्क आणि जनसहभागाचे महत्त्वही अधोरेखित केले. पोलीस दलात काम करणारे काही कनिष्ठ कर्मचारी तंत्रज्ञानाच्या वापरात वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक कुशल असू शकतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून शिकण्यास संकोच करू नये.

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेतल्यास पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढू शकते, असे त्यांनी सांगितले.

 

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

वरिष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव ठेऊ नका

 

पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीत लोकसहभागाला महत्त्व द्यावे. तसेच पथकातील प्रत्येक सदस्याच्या क्षमता आणि उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या कल्याणाची काळजी घ्यावी. केवळ वरिष्ठ-कनिष्ठ असा भेद न ठेवता संपूर्ण पथकाला सोबत घेऊन काम केल्यास अधिक प्रभावीपणे जबाबदाऱ्या पार पाडता येतील, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

पोलिसांना कायदे आणि नियमांमुळे अनेक अधिकार मिळतात. मात्र, समाजात त्यांना मिळणारा खरा सन्मान हा त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि वैयक्तिक मूल्यांवर अवलंबून असतो. नागरिकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, अशी भावना पोलिसांच्या मनात असता कामा नये. त्याऐवजी नागरिकांची सेवा करण्याची बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी स्पष्ट केले.

Delhi North Block Fire: संसद भवनाजवळच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये आग; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

अफवा आणि डीपफेकविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन

 

समाजात भीती आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती (मिसइन्फॉर्मेशन) पसरविण्याचे प्रकार गंभीर समस्या बनत आहेत. विशेषतः सहज प्रभावित होणारे नागरिक आणि तरुण अशा नियोजनबद्ध चुकीच्या माहितीच्या जाळ्यात अडकू शकतात. अशा घटना स्थानिक, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवर घडू शकतात. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वीच स्मार्ट पोलिसिंगच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आणि त्यांची गंभीरता वाढत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. सायबर गुन्ह्यांच्या धोक्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांनी अधिक प्रभावीपणे पार पाडावी. या गुन्ह्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही बदल करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

डीपफेक तंत्रज्ञानामुळे नागरिकांसमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करणाऱ्या व्यक्तींपेक्षा पोलीस यंत्रणा नेहमी एक पाऊल पुढे असली पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, सतत प्रशिक्षण आणि बदलत्या गुन्हेगारी पद्धतींचा अभ्यास आवश्यक आहे.

स्मार्ट, सक्षम आणि संवेदनशील पोलिसिंगच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास जिंकण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना केले.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना कोणता संदेश दिला?

    Ans: नागरिकांशी संवेदनशीलतेने वागावे, सेवाभाव ठेवावा आणि स्मार्ट पोलिसिंगला प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.

  • Que: प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी काय सल्ला दिला?

    Ans: कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडूनही शिकावे, टीमवर्कला प्रोत्साहन द्यावे आणि जनसहभागातून काम करावे, असा सल्ला दिला.

  • Que: पोलिसांनी कोणत्या नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे?

    Ans: सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य द्यावे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

Web Title: President droupadi murmu smart sensitive policing ips officers rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • cyber
  • Droupadi Murmu
  • Rashtrapati Bhavan Delhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.