Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJI Dhananjay Chandrachud: इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे न्यायालयांवर दबाव…; सीजेआय चंद्रचूड यांचे सूचक विधान

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सरकारच्या विरोधात निकाल देणे हे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य नाही, असे स्पष्ट केले आहे. काही दबाव गट दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. न्यायाधीशाला त्याच्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पाहिजे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 05, 2024 | 10:46 AM
DY Chandrachud, Russia, Ukraine, Oschadbank, International Law, National News, World News, Breaking News,

DY Chandrachud, Russia, Ukraine, Oschadbank, International Law, National News, World News, Breaking News,

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा अर्थ नेहमीच सरकारच्या विरोधात निकाल देणे असा होत नाही. पण काही दबावगट इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून न्यायालयांवर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायाधीशांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यास न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याचा ते दावा करतात, अशा शब्दातं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशभरातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर निशाणा साधला आहे.

धनंजय चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायालयांवर असलेल्या अप्रत्यक्ष दबावांविषयी भाष्य केलं आहे. ‘पारंपारिकपणे, न्यायिक स्वातंत्र्याची व्याख्या कार्यकारिणीपासूनचे स्वातंत्र्य अशी केली जाते. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा अर्थ अजूनही सरकारपासूनचे स्वातंत्र्य असा आहे, परंतु न्यायिक स्वातंत्र्याच्या बाबतीत हीच एक गोष्ट महत्त्वाची नाही. आपला समाज बदलला आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या आगमनानंतर. हितसंबंधी गट, दबाव गट आणि गट जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून न्यायालयांवर अनुकूल निर्णय घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.” असं सीजेआय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला तो मेसेज; ‘सलमान खानला जिवंत

इलेक्टोरल बाँड्स

दबावगटाच्या दबावाबाबत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘तुम्ही माझ्या बाजूने निर्णय दिला नाही, तर तुम्ही स्वतंत्र नाही’, हा माझा आक्षेप आहे. स्वतंत्र होण्यासाठी न्यायाधीशांना त्याच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे, जे अर्थातच कायदा आणि संविधानाद्वारे मार्गदर्शित आहे. निवडणूक रोख्यांबाबत मी जेव्हा सरकारच्या विरोधात निर्णय घेतला आणि तो कायदा रद्द केला. तेव्हा न्यायलायला स्वतंत्र म्हटले गेले.

‘जेव्हा तुम्ही इलेक्टोरल बाँड्सवर निर्णय घेता तेव्हा तुम्ही खूप स्वतंत्र असता, पण निर्णय सरकारच्या बाजूने गेला तर तुम्ही स्वतंत्र नसता. पण ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या नाही.त्यामुळे कोणत्याही खटल्यांवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य न्यायाधीशांना दिले पाहिजे.

हेही वाचा: Sharda Sinha: सुप्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज; व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आईचे मुलाने केलं गाणं

पंतप्रधानांची चंद्रचूड यांच्या घरी भेट

दरम्यान, गणेशोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीजेआय चंद्रचूड यांच्या घरी भेट दिली होती. यावरून काँग्रेससह विरोधीपक्षांतील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ” मी त्यांच्या घरी जाणे किंवा त्यांनी माझ्या घरी येणे यात काहीही चुकीचे नाही. राजकीय वर्तुळात अशा गोष्टींबाबत परिपक्वतेची गरज आहे.

Web Title: Pressure on courts through electronic media indicative statement by cji chandrachud nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
2

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
3

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
4

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.