ट्रेन सुटल्यानंतर, त्याच तिकीटवर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येतो का? वाचा... काय सांगतो रेल्वेचा नियम
भारतीय नागरिक सार्वजनिक प्रवासासाठी अनेक साधनांचा वापर करतात. त्यामध्ये भारतीय रेल्वे ही वाहतुकीमधील एक महत्वाचा घटक आहे. दरम्यान आता केंद्र सरकार भारतीय रेल्वेमध्ये नवीन बदल करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय रेल्वेत केले जात आहे. देशभरात मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन निर्माण करत आहे. देशभरात आतापर्यंत अनेक वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता लवकरच देशाला आणखी १५ वंदे भारत ट्रेन मिळणार आहे.
केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वे मंत्रालय एका पाठोपाठ एक अशा वंदे भारत ट्रेन देशवासीयांच्या सेवेसाठी सुपूर्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळेस ते जमशेदपूर येथून विविध राज्यांसाठी १० वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच वेळेस १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, झारखंड,बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनचा करणार आहेत. १५ सप्टेंबर २०२४ पासून या नवीन १० वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या काही दिवसांत झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
टाटानगर – पटना
वाराणसी – देवघर
टाटानगर-ब्रह्मपुर
रांची-गोड्डा
आगरा-बनारस
हावड़ा गया
हावड़ा-भागलपुर
दुर्ग- वीएसके
पीहुबली-सिकंदराबाद
पुणे-नागपुर
लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार
भारतीयांची वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 3 महिन्यात देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहेत. यासाठी बंगळुरू येथील वंदे भारत ट्रेन तयार होणाऱ्या कंपनीत वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) येथे भेट देऊन स्लीपर वंदे भारतची पाहणी केली आहे. यावेळी पुढील 3 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. देशात पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर, वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून तब्बल 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून, कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली. यावेळी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.