
Priyanka Gandhi son Rehan Vadra engagement with Aviva Beg political News
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहानचा साखरपुडा झाला आहे. त्यांनी व्यवसायाने छायाचित्रकार (फोटोग्राफर) असलेल्या अवीवा बेगला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. अहवालानुसार हे दोघेही सुमारे सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रेहान आणि अवीवा दोघेही प्रसिद्धीपासून दूर राहतात, तरी आता एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रेहान आणि अवीवा त्यांच्या आई प्रियंका गांधी यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाली होती.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
सोशल मीडियावर प्रियांका गांधी यांच्या होणाऱ्या सुनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अवीवा बेग या दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केरळमधील नैकेट्टी येथील आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मिळवलेल्या या ४० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, रेहानला सुरक्षारक्षकांनी वेढलेले दिसत आहे. त्याच्यासोबत एक तरुणी आहे, असे म्हटले जाते की तिच प्रियांका गांधींची सून अवीवा बेग आहे. दरम्यान, रेहानने यापूर्वी निवडणूक प्रचारात भाग घेतला आहे. तो त्याची बहीण मिरायासोबत अनेक वेळा दिसला आहे.
कोण आहे अवीवा बेग ?
बाराखंबा रोड येथील मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या अवीवाने सोनीपत येथील ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया आणि कम्युनिकेशन्समध्ये बीए केले आहे. दिल्लीत जन्मलेल्या अवीवा ही उद्योगपती इम्रान बेग आणि इंटीरियर डिझायनर नंदिता बेग यांची मुलगी आहे. अवीवाची आई नंदिता यांनी काँग्रेस मुख्यालय, इंदिरा भवनचे इंटीरियर डिझाइन केले होते. अवीवा एक फोटोग्राफिक स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनी चालवते.
हे देखील वाचा : आत्मनिर्भर भारताला मिळाली चालना; संरक्षण मंत्रालयाचा ‘इतक्या’ कोटींचा करार
मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत, मीडिया रिपोर्टनुसार रेहान आणि अवीवा यांनी अलीकडेच एका समारंभात साखरपुडा केला आहे आणि ते सध्या कुटुंब आणि मित्रांसह राजस्थानमध्ये आहेत. रेहान हा प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांचा मोठा मुलगा आहे. त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून तो एक कलाकार आणि छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो. तथापि, गांधी किंवा वड्रा कुटुंबातील कोणीही अद्याप या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही.