Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर

18 वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मने करार करू नये, तसेच पालकांचे पडताळणी किंवा ई-केवायसी बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 08:38 AM
भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर

भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया तसेच अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सोशल मीडिया वापरण्यासाठी पालक किंवा कायदेशीर पालकांची संमती अनिवार्य करण्यासह विविध सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मेटा आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांनी अकाउंट उघडण्याची किमान वयोमर्यादा १३ वर्षे ठेवली आहे. फेसबुक आणि स्नॅपचॅटसारखे प्लॅटफॉर्म १३ वर्षांच्या मुलांना अकाउंट उघडण्याची परवानगी देतात. मात्र, भारतीय कायद्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती अल्पवयीन मानली जाते. याचिकेत माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ मध्ये सुधारणा करण्याची किंवा यासंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, 18 वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मने करार करू नये, तसेच पालकांचे पडताळणी किंवा ई-केवायसी बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

थेट अ‍ॅक्सेस देण्यावर प्रश्नचिन्ह

अल्पवयीन मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रवेश दिला तरी तो पालक किंवा कायदेशीर पालकांच्या सहभागासह कायदेशीररीत्या मान्य पद्धतीने असावा, अशी मागणीही याचिकेत आहे. सेवांचे स्वरूप आणि त्यातील जोखमीनुसार पालकांचे पडताळणी किंवा ई-केवायसी करण्याची तरतूद असावी, असेही म्हटले आहे.

अनेक धोक्यांचा करावा लागू शकतो सामना

मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतंत्रपणे प्रवेश दिल्यास ऑनलाईन ग्रूमिंग, लैंगिक शोषण, मानवी तस्करी, वर्तनाचे प्रोफाईलिंग, वैयक्तिक माहितीचा गैरवापर, सायबरबुलिंग तसेच वयाला अयोग्य सामग्री यांसारख्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

सुरक्षा उपायांची अत्यंत गरज

नोटीस बजावताना खंडपीठाने म्हटले, भारतात काही सुरक्षा उपायांची गरज आहे. स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील एच. एस. फूलका हजर होते. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, बाल लैंगिक शोषणाच्या साहित्याचा प्रसार आणि ताबा ठेवण्यास मनाई करणाऱ्या कठोर दंडात्मक तरतुदी असूनही, ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वयंचलित सामग्री-गाळणी साधने आणि वय-पडताळणी यंत्रणा लागू करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

शाळकरी मुलीची हाक अन् बाप्पाचा प्रतिसाद ! एका प्रेरणेतून नरेंद्र दामलेंनी साकारली ९६ गणरायांची ‘रूपं’

Web Title: Proposal to ban social media for children under 18 in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Social Media

संबंधित बातम्या

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल
1

Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल

Paragliding Rescue Video: हवेत लटकला जीव अन् खाली बघ्यांची गर्दी! रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही अवाक
2

Paragliding Rescue Video: हवेत लटकला जीव अन् खाली बघ्यांची गर्दी! रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही अवाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.