Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paragliding Rescue Video: हवेत लटकला जीव अन् खाली बघ्यांची गर्दी! रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही अवाक

Paragliding Rescue Video: पॅराग्लायडिंग करताना एक रशियन पॅराग्लायडर उंचावर तारांमध्ये अडकला. SDRF पथकाने क्रेनच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याची सुटका केली. घटनेचा VIDEO व्हायरल.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 12:53 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Paragliding Rescue Video: पॅराग्लायडिंग करत उंच आकाशातून पर्वत आणि निसर्गाचे सुंदर दृश्य पाहण्याचा अनुभव अनेकांना आकर्षित करतो. मात्र, या साहसी खेळात छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर पॅराग्लायडिंगदरम्यान घडलेल्या अशाच एका थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका रशियन पॅराग्लायडरचा हवेतच तारांमध्ये अडकल्याचा व्हिडीओ समोर आला असून, त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर SDRF पथकाने त्याची सुटका केली.

हवेत उंच तारांमध्ये अडकला पॅराग्लायडर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये एक रशियन पॅराग्लायडर उंचावर असलेल्या तारांमध्ये अडकलेला दिसत आहे. तो इतक्या उंचीवर अडकला होता की स्वतःहून खाली उतरणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी रस्ता बंद करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती संपूर्ण घटनेची माहिती देताना दिसत आहे. पॅराग्लायडर ज्या उंचीवर अडकला होता, तिथपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने त्याच्या बचावासाठी हेलिकॉप्टरची गरज भासू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

उंच क्रेनच्या मदतीने सुरू केलं बचावकार्य

या घटनेचा दुसरा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये बचाव पथक पॅराग्लायडरपर्यंत पोहोचण्यासाठी उंच क्रेनचा वापर करताना दिसत आहे. क्रेन हळूहळू वर नेऊन बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर पथकातील सदस्य त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण बचावकार्यासाठी SDRF पथकाला जवळपास तीन तास लागले.

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!

रेस्क्यू VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

या घटनेचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये पॅराग्लायडर इतक्या उंचीवर अडकलेला पाहून अनेकांनी त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये बचाव पथकाने केलेली मेहनत पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.

एका युजरने गंमतीने, “आकाशातून खाली सोडले, खजुराच्या झाडावर अडकले,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने बचावकार्याचा व्हिडीओ पाहून हा दिवसातील सर्वात सुंदर व्हिडीओ असल्याचं म्हटलं.

या घटनेने साहसी खेळांचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Web Title: Paragliding rescue video russian person stuck in wires 3 hour rescue ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Social Media
  • Video Viral

संबंधित बातम्या

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!
1

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
2

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
3

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत
4

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.