मुंबई – जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठा हल्लाबोल केला आहे. न्यूज वेबसाईट द वायरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत, लो हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं अपयश असल्याची टीका केलीय. २०१९ साली झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हे केंद्रीय गृहमंत्रालयाचं अपयश असल्याची टीका केलीय. 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या चुकीमुळेच पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा प्रकार घडल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यावेळी बोलण्यास मनाई करण्यात आली होती, असंही मलिक म्हणालेत. सत्यपाल मलिक हा हल्ला झाला त्यावेळी जम्मू आणि काश्मीरचे राजयपाल होते. नरेंद्र मोदी सरकारनंच त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली होती.
पुलवामा परिसर हा संवेदनशील पिरसर आहे. त्या ठिकाणी सैनिकांची ने-आण करण्यासाठी एयरक्राफ्टचा वापर करण्यात येतो. 2019 साली ज्यावेळी हे जवान त्या रस्त्यावरुन जाणार होते, त्यावेळी सीआरपीएफनं एयरक्राफ्टची मागमी केली होती. मात्र गृहमंत्रालयानं ती परवानगी दिली नाही. त्यातच हल्ला झाल्यामुळं हे केंद्रीय गृहमंत्रालयाची बेपर्वाई होती, अशी टीका मलिक यांनी केलीय. ज्या रस्त्यावरुन हे जवान जाणार होते, त्या रस्त्याची योग्य तपासणी आणि निगराणी ठेवण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.
पंतप्रधान मोदी यांना काश्मीरबाबत काहीही माहिती नसल्याचंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. काश्मीरबाबत ते अज्ञानी आहे आणि त्यांची गफलत होते, असं मलिक म्हणालेत. जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यापूर्वी मलिक त्या ठिकाणी राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराबाबत फारसा द्वेष नाही, असंही ते म्हणालेत.