आपला आणखी मोठा धक्का बसणार? भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजप २६ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर आला आहे. भाजपचा ४८ जागांवर विजय झाला तर आम आदमी पक्ष ६२ वरून २२ जागांवर आला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचं राजकीय भवितव्य धोक्यात असल्याची चर्चा असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात असल्याच्या गौप्यस्फोट काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी केला आहे. त
भगवंत मान गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत आणि ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात. असा दावा त्यांनी केला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.भगवंत मान महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंच्या मार्गावर जाऊ शकतात, असेही त्यांनी संकेत दिले आहेत. पंजाबमधील ३० हून अधिक आपचे आमदार पक्ष सोडण्यास तयार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
“जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे विमान चंदीगडमध्ये उतरेल तेव्हा एकनाथ शिंदे हे पहिले प्रवासी असतील आणि भगवंत मान असतील.” भगवंत मान आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यातील संबंधात तणाव वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरुद्ध बंड केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाल्यानंतर शिवसेना आपल्या हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेत बंड केले, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे नंतर भाजपप्रणित महायुती आघाडीत सामील झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
बाजवा यांनी एक मोठा दावा करत म्हटले आहे की, पंजाबचा आम आदमी पक्ष (आप) आणि दिल्लीचा आप यांच्यातील राजकीय तणाव सतत वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे पंजाब अध्यक्ष अमन अरोरा यांनी एक वादग्रस्त विधान केले होते ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की पंजाबसारख्या राज्यात मुख्यमंत्री फक्त शीख असणे आवश्यक नाही. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि अरविंद केजरीवाल आणि पंजाब आप नेत्यांमध्ये काही मोठे मतभेद असू शकतात असे संकेत दिले जात आहेत.
ते म्हणाले की, जाबमधील एका आमदाराच्या आत्महत्येमुळे लुधियाना विधानसभेची जागा रिक्त झाली. पंजाबमध्ये आपली राजकीय पकड आणखी मजबूत करण्यासाठी केजरीवाल या संधीचा फायदा घेण्याची योजना आखत असल्याची अपेक्षा आहे. काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा यांचा असा विश्वास आहे की केजरीवाल आधीच पंजाबमध्ये त्यांच्या भूमिकेचे नियोजन करत होते, विशेषतः जेव्हा दिल्लीत त्यांच्या पक्षाची स्थिती मजबूत दिसत नव्हती. बाजवा म्हणाले की, अमन अरोराचे हे विधान एक धोरणात्मक पाऊल असू शकते, जे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी जाणूनबुजून दिले गेले आहे.