तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का सरसळतं? राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल
माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतोय, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दात ठणकावताना इशारही दिला होता. राजस्थानमधील बिकानेर येथील सभेत ते बोलत होते. दरम्यान लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या या भाषणानंतर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी तुम्ही पोकळ भाषणं देणं थांबवा, तुमचं रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरचं का सळसळतं, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
मोदीजी, पोकळ भाषणे देणे थांबवा. मला सांगा की तुम्ही दहशतवादावर पाकिस्तानवर विश्वास का ठेवला? ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का सळसळतं? तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी, काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारला. खेडा म्हणाले, साहेब, सिंदूर शिरांमध्ये लावले जात नाही, ते केसांमध्ये सजवले जाते. निष्पापांच्या रक्तावर स्वस्त राजकारण करण्यात तुमचा काही संबंध नाही. संवादबाजी बाजूला ठेवा आणि देशाला सांगा की ट्रम्पच्या इशाऱ्यावर तुम्ही सिंदूरशी का व्यवहार केला? पहलगाममधील सुरक्षेतील त्रुटीसाठी कोण जबाबदार आहे? आजपर्यंत चारही दहशतवादी बेपत्ता का आहेत? लष्करी कारवाईपूर्वी परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून का कळवले? या फोन कॉलमुळे भारताचे काय नुकसान झाले?
Priyanka Gandhi : देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत
दुसरीकडे, काँग्रेस नेते प्रणीत शिंदे म्हणाले, आज देश स्पष्टता, पारदर्शकता आणि निर्णायक नेतृत्वाची मागणी करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठकीला का उपस्थित राहत नाहीत? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सतत पहलगाम हल्ल्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान मोदी यापासून पळ का काढत आहेत? लोकांना ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. पण, नरेंद्र मोदी हे सांगण्यास तयार नाहीत. मोदी सरकार काय लपवू इच्छिते? पंतप्रधान मोदी जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत. जनतेला लिहिलेल्या भाषणांऐवजी प्रामाणिक उत्तरे हवी आहेत.