
Rahul Gandhi Speech,
निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधिशांनाच का वगळण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०२३ मध्ये केंद्राने कायद्यात बदल का केला. ज्यामुळे निवडणूक आयुक्तांना त्यांच्या कोणत्याही कृतीसाठी शिक्षा केली जाऊ शकत नाही.यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी भेट दिली नव्हती. निवडणुका झाल्यानंतर ४५ दिवसांतच सीसीटिव्ही फुटेज नष्ट करण्याची परवानगी देणारा कायद्यात बदल का करण्यात आला, असे सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी मोदी (Narendra Modi) सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नकेला आहे. तसेच हा डेटाचा प्रश्न नसून निवडणुका चोरण्याचा प्रश्न असल्याचा हल्लाबोलही राहुल गांधींनी केला आहे.
Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…
महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यंच्या समान भारताच्या कल्पनेचा नाश करण्याचा प्रकल्प सुरू झाला, या प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणजे भारतातील संस्थात्मक चौकटीवर ताबा मिळवणे. आता भारतीय विद्यापिठांच्या कुलगुरुंची नियुक्ती ही योग्यता, क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित राहिली नाही. तर ते विशिष्ट संघटनेचे सदस्य आहेत. या आधावर केली जाते. सीबीआय (CBI), ईडी (ED) आणि आयकर विभाग (Income Tax Department) यांसारख्या महत्त्वाच्या तपास संस्थांवर नियंत्रण मिळवणे, तसेच आपल्या विचारसरणीचे समर्थन करणारे आणि विरोधकांविरोधात कार्यवाही करणारे नोकरशहा नियुक्त करणे—ही संस्थात्मक ताब्याची दुसरी पायरी मानली जात आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवणारी संस्था देखील आता त्यांच्या प्रभावाखाली गेली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, एक काळ असा होता जेव्हा निवडणूक आयोग संस्थात्मकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वायत्त होता; मात्र आज तो आरएसएस आणि भाजपच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोग आता स्वतंत्र पंच म्हणून काम न करता सत्ताधारी पक्षाशी “समन्वयाने” निर्णय घेतो. सरकारी सूचनांनुसार निवडणूक वेळापत्रक आखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आणि सरकारी विमानाचा वापर सुलभ करण्यासाठी देशातील निवडणुका महिनोंभर पुढे ढकलल्या जातात, असे ते म्हणाले. “हे समान खेळाचे मैदान नाही,” असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत इतका रस का आहे? त्यांना स्वतःच पंच कोण असेल हे ठरवायचे आहे, जेणेकरून सामन्याचा निकाल आधीच निश्चित करता येईल.”