हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
Pune Sahyadri Hospital Vandelised: पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटल प्रशानसाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये घुसून रिसेप्शन विभाग, काचेच्या पार्टिशन आणि संगणकांची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी रुग्णाच्या मृत्यूवरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.
Nagpur Leopard : अखेर तीन दिवसानंतर बिबट्या जेरबंद, बेशुद्ध होऊन छतावरून कोसळला
बुधवारी सकाळी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या एका ७७ वर्षीच रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूवरून जवळपास १०-१२ नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णलयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूमुळे त्याच्या नातेवाईकांच्या एका ग्रुपने ११ वाजण्याच्या सुमारास गोंधळ सुरू केला. त्यावरून त्यांनी दगडफेक सुरू केली. हॉस्पिटलचे प्रवेशद्वार आणि खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. काचा फोडण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स वापरले होते. घटनेची माहिती मिळताच आमचे पोलिस तिथे पोहचले आणि त्यांना ताब्यात घेतले.या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही.
हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. सुनील राव एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, केरू सदाशिव सपकळ यांना २८ नोव्हेंबरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?
डॉ. राव म्हणाले, “हडपसरमधील एका खाजगी नर्सिंग होममध्ये रुग्णावर तीव्र स्वादुपिंडदाहाचा उपचार सुरू होता. उपचारादरम्यान अंतर्गत छिद्र पडल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. मिलिंद चाकणे, डॉ. माधुरी जगताप आणि डॉ. दीपक कवाडे यांच्या सर्जिकल टीमने शस्त्रक्रिया करून छिद्र यशस्वीरीत्या बंद केले. तसेच क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि आयसीयू संचालक डॉ. कपिल बोरावके यांनीही रुग्णावर उपचार केले.”
ते पुढे म्हणाले, “रुग्णाची प्रकृती उपचारानंतर सुधारली होती; मात्र दीर्घकाळ असलेल्या सह-रुग्णता (comorbidities) आणि गुंतागुंतीमुळे त्यांची तब्येत हळूहळू खालावत गेली. याबाबत नातेवाईकांना सातत्याने समुपदेशन करण्यात आले होते. दुर्दैवाने, आज सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर समुपदेशन करूनही काही नातेवाईकांनी रुग्णालयात शिवीगाळ करत दगडफेक केली, ज्यामुळे इमारतीचे नुकसान झाले. यासंबंधी आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत.”
.






