Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.दरम्यान देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रोजेक्टचे काम वेगाने सुरु आहे. याच दरम्यान या प्रोजेक्टबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टमधील वापी-साबरमतीमधील जे काम आहे ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तर पूर्ण अहमदाबाद -मुंबई हा ५०८ किलोमीटरचा मार्ग डिसेंबर २०२९ पर्यंत होण्याचा अंदाज आहे. बुलेट ट्रेनचा हा प्रोजेक्ट तांत्रिकदृष्ट्या किचकट आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो.
एमएएचएसआरचे निर्माण कार्य जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक साहाय्याने केले जात आहे. हा प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र, आणि दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशातून जाणार आहे. या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गिकेत मुंबई, ठाणे, विरार, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती असे स्टेशन्स असणार आहेत.
विशेष डेपो बांधले
महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही बुलेट ट्रेनसाठी विशेष डेपो बांधले जात आहेत. जर सगळे असेच राहिले तर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला जपानहून शिंकान्सेन ट्रेनचे डबे येऊ शकतात आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन चालवता येईल.
Bullet Train : बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार; २०२९ पासून सेवा उपलब्ध
ही उत्पादने भारतात बनणार
या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू भारतात बनवल्या जात आहेत. लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री आणि गर्डर ट्रान्सपोर्टर्स भारतातच तयार केले जातात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत आता हाय स्पीड ट्रेन्स आणि तंत्रज्ञानातही स्वावलंबी होत आहे. पूर्ण-स्पॅन तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेग १० पटीने वाढला आहे. प्रत्येक स्पॅन गर्डरचे वजन सुमारे ९७० टन असते. याव्यतिरिक्त, आवाज कमी करण्यासाठी वायाडक्टच्या दोन्ही बाजूंना ३ लाखांहून अधिक ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत.
मुंबई-अहमदाबाद प्रोजेक्टचा खर्च किती?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचा साधारण खर्च हा १,०८,००० कोटी इतका आहे. जपान सरकार, भारत व गुजरात आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे हा खर्च करणार आहेत. साधारणतः हा पूर्ण प्रोजेक्ट २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत पावसाळी आदिवेशनात सांगितले आहे.