बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार; २०२९ पासून सेवा उपलब्ध
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, गुजरातमधील सुरतजवळ ४० मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचे कामही पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्र्यांव्यतिरिक्त, राज्य परिवहन मंत्र्यांनीही काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. सुरतमधील भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन जवळजवळ तयार झाले आहे. उर्वरित कामही युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.
गुजरातमध्ये सुमारे १५७किलोमीटरचा ट्रॅक बेडदेखील टाकण्यात आला आहे असे म्हटले जात आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होण्याची I अपेक्षा आहे. २०२९ पर्यंत पूर्ण सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा भाग पूर्ण स्पॅन लाँचिंग तंत्राचा वापर करून बांधण्यात आला आहे, ज्यामुळे कामाला गती मिळाली आहे. या काळात, अनेक नदी पूल, स्टील आणि स्टेशन इमारतीदेखील बांधण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात आतापर्यंत ३८३ किमी खांब, ४०१ किमी पाया आणि ३२६ किमी गर्डर कास्टिंग पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही बुलेट ट्रेनसाठी विशेष डेपो बांधले जात आहेत. जर सगळे असेच राहिले तर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला जपानहून शिंकान्सेन ट्रेनचे डबे येऊ शकतात आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन चालवता येईल.
या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू भारतात बनवल्या जात आहेत. लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री आणि गर्डर ट्रान्सपोर्टर्स भारतातच तयार केले जातात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत आता हाय स्पीड ट्रेन्स आणि तंत्रज्ञानातही स्वावलंबी होत आहे. पूर्ण-स्पॅन तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेग १० पटीने वाढला आहे. प्रत्येक स्पॅन गर्डरचे वजन सुमारे ९७० टन असते. याव्यतिरिक्त, आवाज कमी करण्यासाठी वायाडक्टच्या दोन्ही बाजूंना ३ लाखांहून अधिक ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत.