Ratan tata death live updates: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेआ, माया आणि नेव्हिल आहेत तरी कोण?
Ratan Tata death news live updates: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांना आज राज्य सन्मानाने निरोप देण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या टाटा समूहाचा पुढचा दावेदार कोण अशा बातम्या सर्वत्र सुरु होत आहेत. रतन टाटा यांच्या टाटा समूहाचा मोठा वारसा आता पुढील पिढी हाती घेणार आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार
मिठापासून सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत पसरलेल्या या गटाचे नेतृत्व करण्यासाठी तीन प्रमुख नावे समोर येत आहेत, ज्यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी मानले जाते. यामधये लेआ, माया आणि नेव्हिल टाटा यांच्या नावांचा समावेश आहे. या तिघांपैकी एक रतन टाटा यांचा उत्तराधिकारी होत टाटा समूहाची धुरा हाती घेऊ शकतो. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची मुले लेआ टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा ही टाटा समूहात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत आणि आता त्यांच्या उत्तराधिकारांच्या यादीत आघाडीवर आहेत. या तिघांबद्दल आता जाणून घेऊया.
नोएल टाटा यांची मोठी मुलगी लेआ टाटा हिने 2006 मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये असिस्टंट सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्या आता टाटा समूहात विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत आणि टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या विश्वस्तही आहेत.
हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांचं निधन; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
नोएल टाटा यांची दुसरी मुलगी माया टाटा टाटा अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवणूकदार संबंध आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची प्रमुख आहे. ती टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टची ट्रस्टी देखील आहे आणि टाटा ग्रुपमध्ये प्रमुख भूमिका बजावते. माया टाटा यांची शैक्षणिक ओळखही तितकीच उल्लेखनीय आहे. त्यांनी युनायटेड किंगडममधील बेयस बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वारविक येथे अभ्यास केला, जिथे त्यांनी जागतिक व्यवसायातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली.
नोएल आणि त्यांची पत्नी आलू मिस्त्री यांचा मुलगा नेव्हिल टाटा, ट्रेंट कंपनीशी जोडलेले आहेत आणि किरकोळ व्यवसायात त्यांचे प्रमुख स्थान आहे. नेव्हिलचा विवाह मानसी किलरलोस्करशी झाला, जी किलरलोस्कर ग्रुपची वारसदार आहे. त्यांना जमशेत आणि टियाना टाटा ही दोन मुले आहेत. नेव्हिल हे टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत, जिथे ते त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडतात.