उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं असून यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ratan Tata death news live updates: दिल्ली : उद्योगपती जगतातील सर्वोच्च व्यक्तीमत्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चिंताजनक प्रकृती झाल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हे फक्त उद्योगविश्वाचे नाही तर भारत देशाचे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, श्री रतन टाटा जी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्याच वेळी, त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अटूट बांधिलकीमुळे त्याने अनेक लोकांसमोर स्वत: ला प्रिय केले, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Leaving for Lao PDR to take part in the 21st ASEAN-India and 19th East Asia Summit. This is a special year as we mark a decade of our Act East Policy, which has led to substantial benefits for our nation. There will also be various bilateral meetings and interactions with various…
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2024
जेष्ठ नेते शरद पवार यांनी रतन टाटा यांच्याबाबत भावना व्यक्त करताना लिहिले आहे की, जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 9, 2024
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील रतन टाटा यांच्या प्राणज्योत मालवल्यामुळे शोक व्यक्त केला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की,रतन टाटा हे दूरदृष्टी असलेले माणूस होते. व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि टाटा समुदायाप्रती माझ्या संवेदना. अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Ratan Tata was a man with a vision. He has left a lasting mark on both business and philanthropy.
My condolences to his family and the Tata community.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024