Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार
Ratan Tata death news live updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. टाटा समूहाने ही माहिती दिली आहे. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत हे अत्यंत दु:खद आहे. ते खरोखरच एक असाधारण नेते होते, ज्यांच्या अतुलनीय योगदानाने केवळ टाटा समूहच नव्हे तर देशालाही आकार दिला आहे. रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व नेते, अभिनेते, अभिनेत्री यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हेदेखील वाचा- Ratan Tata Death Live Updates : रतन टाटांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वारसदार नेमका कोण असणार? ‘ही’ नावं सध्या चर्चेत…
रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतात मोठी शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना काल रुग्णालायत दाखल करण्यात आली होते. मात्र रात्री उशीरा त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झूंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
रतन टाटा यांना आज राज्य सन्मानाने निरोप देण्यात येणार आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या घरी नेण्यात आले. आज सकाळी 10 वाजल्यापासून लोकांना मुंबईत त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. तर रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत दर्शनासाठी दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात येथे ठेवण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पोलिसांचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द
अभिनव देशमुख यांनी सांगितले की, रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत दर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना आवाहन आहे की, तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि येण्यापूर्वी त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी. या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल. रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
रतन टाटा यांच्या निधनाच्या दु:खद बातमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी संवाद साधला आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर झारखंड सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरवरील आपल्या शोकसंदेशात लिहिले आहे की, झारखंडसारख्या देशाच्या मागासलेल्या राज्याला ओळख देणारे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पदविभूषण रतन टाटा यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे.