Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratan tata death live updates: रतन टाटांचे मार्गदर्शन अमुल्य… आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

Ratan Tata death news updates: रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा आणि बिहारचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. रतन टाटाजी हे एक दूरदर्शी व्यापारी नेते आणि विलक्षण माणूस होते, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 09:42 AM
Ratan tata death live updates: रतन टाटांचे मार्गदर्शन अमुल्य... आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

Ratan tata death live updates: रतन टाटांचे मार्गदर्शन अमुल्य... आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

Follow Us
Close
Follow Us:

Ratan Tata death news live updates: देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आज शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यूशी सुरु असलेला लढा अयशस्वी ठरला. रतन रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा, अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी, उद्योगपती मुकेश अंबानी, यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेआ, माया आणि नेव्हिल आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, रतन टाटा हे एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांपैकी एकाला स्थिर नेतृत्व प्रदान केले. तसेच, भारतातील उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी आपल्या नम्रता, दयाळूपणा आणि साध्या स्वभावाने अनेकांनी मन जिंकली आहेत.

दिग्गज कधीही मरत नाहीत: आनंद महिंद्रा

महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील रतन टाटा यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, रतन टाटांची अनुपस्थिती स्वीकारण्यास मी असमर्थ आहे. भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या मार्गावर आहे आणि आम्ही जिथे आहोत तिथे पोहोचवण्यात रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे मार्गदर्शन अमुल्य ठरले असते, दिग्गज कधीही मरत नाहीत.

I am unable to accept the absence of Ratan Tata.

India’s economy stands on the cusp of a historic leap forward.
And Ratan’s life and work have had much to do with our being in this position.

Hence, his mentorship and guidance at this point in time would have been invaluable.… pic.twitter.com/ujJC2ehTTs

— anand mahindra (@anandmahindra) October 9, 2024

गौतम अदानी यांनीही शोक व्यक्त केला

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, भारताने आधुनिक भारताच्या मार्गाला नव्याने दिशा देणारा एक दूरदर्शी व्यापारी नेता गमावला आहे. रतन टाटा हे केवळ एक व्यावसायिक नेते नव्हते – त्यांनी भारताच्या भावनेला अखंडता, करुणा आणि अधिक चांगल्यासाठी अतूट बांधिलकीने परिपूर्ण रूप दिले. त्यांच्यासारखे दिग्गज कधीही मावळत नाहीत. ओम शांती.

India has lost a giant, a visionary who redefined modern India’s path. Ratan Tata wasn’t just a business leader – he embodied the spirit of India with integrity, compassion and an unwavering commitment to the greater good. Legends like him never fade away. Om Shanti 🙏 pic.twitter.com/mANuvwX8wV

— Gautam Adani (@gautam_adani) October 9, 2024

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा, राजकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स अकाऊंटवर म्हटलं आहे की, रतन टाटा यांच्या निधनाने दु:ख झाले. ते भारतीय व्यवसायाचे एक दिग्गज होते, जे आपल्या अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

रतन टाटा दूरदर्शी नेता: तेजस्वी

एक मोठे उद्योगपती, दूरदर्शी नेते, प्रामाणिकपणा, नैतिकता, दयाळूपणा आणि सद्भावनेचे उदाहरण, मानवी मूल्यांवर आणि परोपकारावर गाढ विश्वास असलेले रतन टाटा यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. ते नेहमी इतरांसाठी जगणारे उद्योगपती होते. त्यांनी आदर्श जीवन जगले. ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो.

उद्योगपती पवन चतुर्वेदी म्हणाले की, रतन टाटा आज आपल्यात नाही, पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील.

काय म्हणाले मुकेश अंबानी?

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, देशाने आपला एक सर्वात प्रतिष्ठित आणि दयाळू मुलगा गमावला आहे. हा देशासाठी एक दुःखाचा दिवस आहे. त्यांचे जाणे केवळ टाटा समूहासाठीच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने मला वैयक्तिकरित्या दु:ख झाले आहे. मी दु:खी आहे कारण मी एक चांगला मित्र गमावला आहे.

Web Title: Ratan tata death live updates gautam adani and anand mahindra shared emotional post for ratan tata death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 09:39 AM

Topics:  

  • Anand Mahindra
  • Ratan Tata
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
1

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?
2

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.