
RBI
मुंबई : जोखीम लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ कर्जाची चौकशी वाढवली आहे. याशिवाय टॉप-अप गृहकर्जही तपासाच्या कक्षेत घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आर्थिक व्यवस्थेत धोका वाढू शकतो. हे थांबवण्यासाठी तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
आरबीआयने बँका आणि एनबीएफसीद्वारे अशा कर्जावर करडी नजर ठेवली आहे. पर्सनल लोन देणाऱ्या संस्थांना जेथे धोका वाढत आहे, अशा कर्जांना आळा घालण्यास सांगितले आहे. बँका आणि बिगर बँक वित्तीय कंपन्यांच्या काही किरकोळ कर्जाला लगाम घालण्यासाठी आरबीआयने सहा महिन्यांत अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये त्यांना ताकीदही देण्यात आली आहे.
याआधी आरबीआयने म्हटले होते की, जास्त कर्ज घेण्यापासून आर्थिक व्यवस्थेला धोका नाही. मात्र, आता नव्या तपासामुळे आर्थिक कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. आरबीआय आता पर्यवेक्षणाचे चार टप्पे तपासत आहे. आरबीआय संस्थांना योग्य दिशेने पावले उचलण्याची संधी देऊ इच्छिते. तसेच गरज पडल्यास कारवाईही करू शकते.
व्याजदरात वाढ
आरबीआयने गेल्या दोन वर्षात रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ केला असली तर बँकांचे कर्ज वार्षिक आधारावर 16% ने वाढत आहे, जे चालू आर्थिक वर्षातील जीडीपीच्या अंदाजे 7.6% वाढीच्या दुप्पट आहे.
चुकीच्या पद्धतीने जाहिरात
आरबीआय आता मॉर्टगेज टॉप-अपवर बारकाईने नजर ठेवत आहे. गहाण कर्ज हे मुळात घराच्या दुरुस्तीसाठी किवा जोडण्यासाठी असतात. पण बँका त्यांना लग्न, सुट्या आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी जाहिरात देत आहेत.