Relief from Supreme Court to Sadguru Jaggi Vasudev Isha Foundation
चेन्नई : सदगुरू जग्गी वासुदेव यांचे देशासह जगभरामध्ये अनेक अनुयायी आहेत. त्यांच्या आश्रमामध्ये येऊन ध्यान साधना करणारे देखील अनेक साधक आहेत. पण मागील काही महिन्यांपासून सदगुरू जग्गी वासुदेव यांचा कोइम्बतूर येथील आश्रम वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. दोन बहिणींना आश्रमामध्ये कोंडून ठेवल्याची तक्रार एका वडीलांनी केली होती. हे प्रकरण मद्रास हाय कोर्टामध्ये सुरु होते. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. या प्रकरणामध्ये आता ईशा फाऊंडेशनला दिलासा मिळाला आहे.
निवृत्त प्राध्यापक डॉ. एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात ईशा फाऊंडेशनच्या आश्रमाविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलींना आश्रमात बळजबरीने डांबून ठेवल्याचा आरोप यामध्ये केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना आश्रमाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे ईशा फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. या प्रकरणामध्ये आता ईशा फाऊंडेशनला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली असून भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी फटकारले देखील आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये केस गेल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिका विचार करण्यात आला. यावेली मद्रास उच्च न्यायालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. दोन महिला स्वच्छेने त्या आश्रमात राहत आहेत, हे त्यांनी सांगितल्यानंतरही उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावण्याऐवजी आपले कार्यक्षेत्र ओलांडून तपासणी करण्याचा निर्णय घेतला, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?
ईशा फाऊंडेशनने पोलिसी कारवाई आणि मद्रास हाय कोर्ट यांच्या निर्णायाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. यावेळी या प्रकरणाशी संबंधित दोन्ही महिलांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्याशी खंडपीठाने सरन्यायाधीशांच्या दालनात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी दोन्ही महिलांनी , त्या दोघीही स्वच्छेने आश्रमात राहत आहेत हे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना सांगितले. त्यामुळे ईशा फाऊंडेशनला दिलासा मिळाला असून मद्रास हाय कोर्टला फटकारले आहे.