Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्या 24 तासापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू, छिद्रातून दिलं जातयं ऑक्सिजन, पाईपमधून अन्न..

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. येथे कंप्रेसरद्वारे दाब निर्माण करून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाइपलाइनद्वारे अन्न पाठवले जात आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 13, 2023 | 11:41 AM
गेल्या 24 तासापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू,  छिद्रातून दिलं जातयं ऑक्सिजन, पाईपमधून अन्न..
Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग पहाटे अचानक फुटला, त्यामुळे त्यात काम करणारे सुमारे 40 कामगार आत अडकले. या दुर्घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटला असून,सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. बचाव पथकाकडून बोगद्याचा ढिगारा हटवण्यात येत आहे. आतापर्यंत ६० मीटरपर्यंतचा ढिगारा हटवण्यात आला असून ३० ते ३५ मीटरचा ढिगारा शिल्लक आहे.

[read_also content=”पूर्व वैमन्यस्यातून एका कुटुंबातील चौघांची हत्या, आईसह तीन मुलांना संपवलं, हल्लेखारांनी 12 वर्षाच्या मुलालाही सोडलं नाही! https://www.navarashtra.com/crime/4-people-of-same-family-killed-in-karnataka-udapi-nrps-480371.html”]

पाईपद्वारे पाठवला जात आहे ऑक्सिजन

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाइपलाइनद्वारे कंप्रेसरद्वारे दाब निर्माण करून रात्री बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हरभऱ्याची पाकिटे पाठवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्याचं परिस्थितीवर लक्ष

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुहेला यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि बचाव कार्याला गती देण्यास सांगितले. रुहेला यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सीएम धामी यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ मी उपस्थित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी त्यांना बचाव कार्याला गती देण्यास सांगितले आहे. मी प्रार्थना करतो की प्रत्येकजण सुखरुप बाहेर यायला हवं.

कसा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा ते दंडलगाव या मार्गावर  बोगद्यातं बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.

Web Title: Rescue operation undergo since 24 hours in uttarkashi tunnel accident nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 11:41 AM

Topics:  

  • tunnel collapse

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.