robbery
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पंजाब नॅशनल बँकेवर (Robbery In Punjab National Bank) दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरच्या धाकाने बंधक बनवून बँकेतील जवळपास १० लाखांचा ऐवज लुटला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे जनतेत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
[read_also content=”हेल्मेट सक्ती बाबतीत मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय; रत्नागिरी जिल्ह्यामध्ये… https://www.navarashtra.com/maharashtra/minister-uday-samants-big-decision-regarding-helmet-compulsion-263329.html”]
दिवसाढवळ्या नूरनगर सिहानी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत शनिवारी ही जबरी दरोड्याची धक्कादायक घटना घडली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बंधक बनवण्यात आले. बँक कर्मचारी पुरते हादरून गेल्यानंतर त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेत दरोडेखोरांनी बँकेतील सुमारे १० लाखांचा मौल्यवान ऐवज लुटला. मिळालेल्या माहितीनुसार, आज मास्क घातलेल्या चार दरोडेखोरांनी पीएनबी बँकेच्या नूरनगर सिहानी शाखेत घुसून रिव्हॉल्वरच्या धाकाने दरोडा टाकला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित बँकेची शाखा सील करण्यात आली असून पोलिसांकडून बोटांचे ठसेही घेतले जात आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत दुपारी १.२० च्या सुमारास चार दरोडेखोर घुसले. त्यातील तिघांनी हेल्मेट घातले होते तर एकाने मास्क घातला होता. बँक कर्मचाऱ्यांना त्यांचा चेहरा पूर्णपणे दिसू शकला नाही. त्यामुळे फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेणे व त्यांची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे. बाईक चालू करून चारही चोरटे बँकेत घुसले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनेच्या वेळी व्यवस्थापकासह तीन बँक कर्मचारी बँकेत उपस्थित होते.