Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझे ८ आणि मोठ्या भावाचे १६ मुले”, “तर हिंदूनी १४ मुलं…”, AIMIM प्रदेशाध्यक्षांचा लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान

AIMIM चे यूपी प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी लोकसंख्या वाढीवरून खळबळजनक विधान केले आहे. 'हम दो हमारे दोन डझन' असा नारा देत त्यांनी मुस्लिमांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 09:05 PM
AIMIM प्रदेशाध्यक्षांचा लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान (Photo Credit- X)

AIMIM प्रदेशाध्यक्षांचा लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “माझे ८ आणि मोठ्या भावाचे १६ मुले”
  • “तर हिंदूनी १४ मुलं…”
  • AIMIM प्रदेशाध्यक्षांचा लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान
Shaukat Ali AIMIM Statement Marathi News: AIMIM चे उत्तर प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. मुरादाबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी मुस्लिमांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत “हम दो, हमारे दो दर्जन” असा नवा नारा दिला आहे.

“माझे ८ आणि भावाचे १६ मुले”; स्वतःच्या कुटुंबाचा दिला दाखला

सभेत उपस्थितांना संबोधित करताना शौकत अली यांनी आपल्या कुटुंबातील मुलांच्या संख्येचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “मला स्वतःला ८ मुले आहेत. माझ्या थोरल्या भावाचे निधन झाले, त्यांना १६ मुले होती. माझ्या ९७ वर्षीय आईला आज ७२ नातवंडे आहेत आणि ती सर्व ६-६ फुटांची तरुण मुले आहेत. मग आमच्या लोकसंख्येची एवढी भीती कशाला वाटते?”

मुरादाबाद, यूपी: AIMIM के यूपी प्रदेश अध्यक्ष शौकत अली ने एक जनसभा के दौरान कहा “…हम आज से एक नारा देंगे हम दो हमारे दो दर्जन। हमारे 8 बच्चे हैं। हमारे बड़े भाई के 16 बच्चे हैं। हमारी माता की उम्र 97 साल है। उनके कम से कम 72 नाती और पोते जवान हैं। हमारी तादाद से घबराहट क्यों… pic.twitter.com/60j0GzoOJF — IANS Hindi (@IANSKhabar) February 9, 2026

अल्लाहचा प्रसाद

“ज्यांना मुले होत नाहीत, ते अनेक ठिकाणी माथा टेकतात. अल्लाह जेव्हा स्वतःहून मुले देत आहे, तर ती आनंदाने स्वीकारली पाहिजेत. जोपर्यंत अल्लाह देतोय, तोपर्यंत घेत राहा,” असे अजब तर्क अली यांनी मांडले.

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; संतप्त जमावाची जाळपोळ, पोलिसांकडून शांतीचे प्रयत्न सुरु

लोकसंख्या म्हणजे ताकद

“काही लोक आमच्या वाढत्या लोकसंख्येमुळे घाबरले आहेत. पण जितकी लोकसंख्या जास्त, तितका देश मजबूत होतो. चीनची लोकसंख्या जास्त आहे, म्हणूनच तो देश आज जगातील एक महासत्ता आहे,” असा दावा त्यांनी केला.

हिंदूंनाही दिला अजब सल्ला

भाजप नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, “जे लोक स्वतः लग्न करत नाहीत, तेच हिंदूंना ४ मुले जन्माला घालण्याचे ज्ञान देतात. मी तर म्हणेन की हिंदू बांधवांनी ४ नाही तर १४ मुले जन्माला घालावीत, जेणेकरून देश अधिक शक्तिशाली होईल.”

काँग्रेसवर दंगलींचा आरोप

लोकसंख्येसोबतच शौकत अली यांनी राजकीय आरोपही केले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या दंग्यांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. “देशात झालेल्या ५० हजार दंगलींमध्ये ९० टक्के मुस्लिम मारले गेले. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत २ लाख २५ हजार मुस्लिमांचे प्राण गेले असून, त्यावेळी काँग्रेसचीच सत्ता होती,” असा आरोप त्यांनी केला.

Kanpur Lamborghini Accident: 10 कोटींच्या लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडले, कोण आहे शिवम मिश्रा?

Web Title: Aimim state president makes controversial statement on population growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • AIMIM
  • Indian Population
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
1

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.