Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

औरैयामध्ये तरुणीने प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी बेडवर सापाची कात, बांगड्या व सिंदूर ठेवून ‘नागीण’ बनल्याची अफवा पसरवली. पोलिस तपासात प्रेमसंबंधाचा खुलासा झाला असून तरुणीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 09:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुणी रात्रीतून प्रियकरासोबत फरार
  • बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर ठेवून बनाव
  • गावात ‘नागीण’ अफवा पसरली, भीतीचे वातावरण
  • पोलिस तपासात प्रेमसंबंधाचा उलगडा
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. एक तरुणी नागीण बनल्याची घटना समोर आली आहे. ती झोपायला गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या बेडवर सापाची कात आणि बांगड्या-सिंदूर सापडले. या घटनेने संपूर्ण गावात दहशत माजली आहे. मात्र पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण सत्य समोर आणलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

Mumbai Crime: संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

घडलेली घटना ही उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यातील फफूंद पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. सकाळी मुलगी बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना बेडवर ५ फूट लांब सापाची कात कपड्यांमध्ये गुंडाळलेली आढळली. जवळच बांगड्या आणि सिंदूर सांडलेले दिसले. त्यांनतर बातमी पसरताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही महिलांनी पूजापाठ सुरु केला. तर काही लोक भीतीने त्या घराकडे जाण्यासही घाबरू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले.

पळून जाण्याचा निर्णय

त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला असून तेव्हा या प्रकरणातील ‘फिल्मी’ सत्य समोर आले. पोलिसांना खोलीत कोणत्याही संघर्षाच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यांनतर तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, कुटुंबाचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.

मुलीने घेतला अंधश्रद्धेचा फायदा

तरुणीने जाणीवपूर्वक सापाची कात मिळून ती बेडवर ठेवली होती. तिला माहित होते की, ग्रामीण भागात अश्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे तिने हा कट रचला. लोकांनी तिच्या बेपत्ता होण्याला ‘रहस्यमयी’ वळण द्यावे आणि तिचा शोध घेऊ नये असा तिने कट रचला. ही संपूर्ण घटना एखाद्या थ्रिरल चित्रपटासारखीच आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी सांगितले की, घडलेला सर्व प्रकार तरुणीने रचलेला एक बनाव होता. ती नागीण बनल्याची चर्चा पूर्णपणे निराधार आहे. आम्ही तरुणीचा मोबाईल सर्व्हिलन्सवर लावला असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका गावात.

  • Que: ‘नागीण’ अफवा कशी पसरली?

    Ans: बेडवर सापाची कात, बांगड्या आणि सिंदूर ठेवून तरुणीने बनाव रचला.

  • Que: पोलिस तपासात काय समोर आले?

    Ans: तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Uttar pradesh snake skin on the bed bangles and vermilion young woman becomes serpent what is the real story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू
1

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी
2

मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.