RSS Sarnghachalak mohan bhagwat on retirement age 75 of PM narendra modi
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तीन दिवसीय शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या प्रवासाची 100 वर्षे – न्यू होरायझन्स या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मोहन भागवत यांनी निवृत्तीवरुन सुरु असलेल्या चर्चांवर देखील भाष्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये 75 हे निवृत्तीचे वय असल्याचे म्हटले जाते. याच तत्त्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या रिटारमेंटच्या चर्चा सुरु होत्या. येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असून त्यांचा हा 75वा वाढदिवस आहे. याचबरोबर 75 ची शाल अंगावर पांघारल्यावर निवृत्ती घ्यायची असते असे वक्तव्य मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये केले होते. त्यामुळे आरएसएसकडून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांना निवृत्ती घेण्याचे सांगितले जात असल्याची चर्चा रंगली. यानंतर आता होत असलेल्या व्याख्यानमालेमध्ये मोहन भागवत यांनी निवृत्तीच्या वयाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात दिवस आधी 11 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे मोहन भागवत हे देखील निवृत्ती घेत नवीन नेतृत्वाला संधी देणार का याची चर्चा रंगली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले की, “मी कधीही असे म्हटले नाही की मी निवृत्त होईल. किंवा दुसऱ्या कोणी 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त व्हावे. संघ जे सांगेल ते आम्ही करु. कोणतेही काम नाकारण्यासाठी आम्ही वयाचे कारण देत नाही,” अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
संघ जे काही सांगेल ते आम्ही करतो…
पुढे मोहन भागनत म्हणाले की, “संघामध्ये काम करताना आम्ही स्वयंसेवक असतो. आमच्याकडे विशिष्ट जबाबदारी सोपवली जाते. ती आम्हाला हवी आहे का नको असा प्रश्नच नसतो. ते काम करु का नको असे नसते. संघाने काम सांगितल्यानंतर ते करावेच लागते. मी जरी 80 वर्षांचा झालो तरी संघाने सांगितले की जा जाऊन शाखा चालवा तर मला ते करावे लागणारच आहे. संघ जे काही सांगेल ते आम्ही करत असतो,” अशी भूमिका आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मी आता सरसंघचालक आहे. पण तुम्हाला वाटतं का मी एकटा सरसंघचालक होऊ शकतो. इथे असणारे 10 लोकं तरी सरसंघचालक होऊ शकतात जे या हॉलमध्ये बसले आहेत. मी जरी गेलो तरी ते पद घेऊन काम पुढे सुरु राहणार आहे. त्यामुळे हे कधी माझ्या निवृत्तीबाबत किंवा इतर कोणाच्या निवृत्तीबाबत बोललो नाही. आम्ही तोपर्यंत काम करण्यासाठी तयार आहोत जो पर्यंत आम्हाला संघ काम करायला सांगितले आहे,” असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.